अदाणी समूहाच्या विरोधात हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर अदाणी प्रकरणावरून संसदेतही गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी अदाणी आणि मोदी यांचे फोटो दाखवत अदाणी यांच्या शेल कंपन्यांमध्ये २० हजार कोटी रूपये कुणाचे आहेत असा प्रश्न विचारला आहे. त्यानंतर आता इस्रायलचे अर्थमंत्री नीर बिरकत यांनी आमचा भारतीय व्यावसायिकांवर विश्वास आहे असं म्हटलं आहे. तसंच भारतातले जे गुंतवणूकदार गुंतवणूक करतील त्यांचं आम्ही स्वागतच करू असंही त्यांनी म्हटलं आहे.

या वर्षी अदाणी समूहाने अदाणी समूहाने इस्रायलचे हैफा हे बंदर $1.2 अब्जांना विकत घेतलं. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर झालेली ही डील होती. अदाणी समूहावर जे आरोप झाले त्याची आम्हाला चिंता वाटत नाही असं बरकत यांनी स्पष्ट केलं आहे. बरकत म्हणाले की, “इस्रायलने भारतीय कंपनीला दोन बंदरांपैकी एक विकत घेण्याची संमती देणं हाच भारतीय व्यावसायिकांवरचा आमचा विश्वास दर्शवतो. हिंडेनबर्गच्या अहवालात काय आहे, अदाणी समूहावर काय आरोप झाले आहेत? याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही.”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात

भारतातल्या गुंतवणूकदारांचं स्वागत करण्यासाठी इस्रायल सज्ज आहे. अधिकाधिक गुंतवणूक आमच्याकडे झाली पाहिजे. आमच्या देशातल्या लोकांच्या हिताची ही बाब आहे. आम्ही हे जे पाऊल उचललं आहे त्यानंतर भारतातले गुंतवणूदार इस्रायलमध्ये येतील असा आम्हाला विश्वास वाटतो असंही बरकत यांनी ANI च्या मुलाखतीत सांगितलं आहे.

इस्रायलचे अर्थमंत्री मीर बरकत हे भारतात आले आहेत. इस्रायलच्या लोकांना भारतात सुरक्षित राहणं आणि व्यवसाय करणं सुरक्षित वाटतं आहे. इस्रायलींचे भारतीयांवर प्रेम आहे आणि भारतीयांनाही इस्रायली आवडतात. आम्हाला सुरक्षित वातावरणात व्यवसाय करणं आवडतं आणि भारतात तसं वातावरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

Story img Loader