शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आज पहिल्यांदाच थेटपणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. गुवाहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन ब्लू’च्या गेटवर शिंदे यांनी प्रसारमाध्यमांच्या काही प्रश्नांना उत्तरं दिली. दुपारी दोन वाजता होणाऱ्या बंडखोर आमदारांच्या बैठकीच्या आधी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना येथे असणारे सर्व आमदार हे स्वखुशीने आल्याचं सांगितलं. तसेच पुढे बोलताना त्यांनी मुंबईमधील शिवसेनेच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यांवरुन येथील (गुवाहाटीमधील) कोणते १५ ते २० आमदार तुमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं जाहीर करावी असं आव्हान केलं आहे. यावेळी प्रसारमाध्यमांनी शिंदे यांना मुंबईला येण्यासंदर्भातील प्रश्न विचारला असता त्यावरही त्यांनी उत्तरं दिलं आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य

दुपारी दीडच्या सुमारास एकनाथ शिंदे यांनी हॉटेल ‘रेडिसन ब्लू’च्या मुख्य प्रवेशद्वारावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिंदे यांनी या ठिकाणी आलेले सर्व आमदार हे त्यांच्या इच्छेने आले असून कोणालाही बळजबरीनं आणण्यात आलं नसल्याचं दावा केलाय. “हिंदूत्वाची भूमिका घेऊन हे आमदार स्वत:च्या मर्जीने आले आहेत. मी शिवसेनेमध्येच आहे, बाळासाहेबांचं हिंदूत्व पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

“बाहेरुन जी माहिती येतेयत त्यामध्ये येथील काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. हे कोण आमदार आहेत त्यांची नावं जाहीर करावी,” असं आव्हान शिंदेंनी शिवसेनेच्या नेत्यांना केलं आहे. आदित्य ठाकरे हे मागील काही दिवसांपासून घेत असणाऱ्या शिवसैनिकांच्या मेळाव्यांबरोबरच प्रसारमाध्यमांसमोर गुवाहाटीमधील आमदारांचे दोन गट असल्याचा दावा करत आहेत. यापैकी एक गट तिथे पळून गेलेल्या आमदारांचा आहे तर दुसरा गट आमच्या संपर्कात आहे, असा दावा आदित्य यांनी केलाय. याच दाव्यावरुन आता शिंदे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान दिलंय.

नक्की पाहा >> Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”

यावेळी प्रसारमाध्यमांनी शिंदे यांना मुंबईमध्ये कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना एकनाथ शिंदेंनी, “मुंबईला आम्ही लवकरच जातोय” असं उत्तर दिलं. मात्र यासंदर्भात कोणतीही तारीख निश्चित झालेली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आमच्या या गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर असून ते वेळोवेळी आमची भूमिका तुमच्यापर्यंत पोहचवतील असंही शिंदे यांनी सांगितलं.

Story img Loader