इंडिया आघाडी, महाविकास आघाडीचे नेते यांची दिल्लीत बैठक पार पडली. त्यानंतर संजय राऊत यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. आम्ही आज जागावाटपाबाबत चर्चा केली. मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी आमची चर्चा झाली. अशोक चव्हाण, सलमान खुर्शीद, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, तसंच विनायक राऊत आणि मी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. संघर्षाच्या या काळात आम्ही एकत्र आहोत आणि यापुढेही एकत्र राहू. महाराष्ट्रात इंडिया आघाडीच्या लोकसभेला सर्वाधिक जागा येतील असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत

जागावाटपावरुन आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. आम्हा सगळ्यांची चर्चा सकारात्मक झाली असंही आज संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्यावर आमचं एकमत झालं आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. जागा कुणाच्या किती असतील त्यावर नंतर चर्चा करु असंही संजय राऊत म्हणाले.

proposals for adarsh nagar and bandra reclamation redevelopment project stuck
पुनर्विकासाचा प्रस्ताव लालफितीत; वांद्रे रेक्लेमेशन, आदर्श नगरच्या विकासाला मंजुरीची प्रतीक्षा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
India Alliance News
INDIA Alliance : इंडिया आघाडी महाराष्ट्रातील निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार, भाजपाने ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप कायम
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
mahayuti government,
लेख : नव्या विधानसभेकडून दहा ठोस अपेक्षा
Sharad Pawar News
Chandrashekhar Bawankule : “शरद पवारांनी या वयात खोटारडेपणा करु नये, पराभव स्वीकारावा आणि..”, भाजपाच्या ‘या’ नेत्याची टीका
Sharad Pawar On Mamata Banerjee
Sharad Pawar : ‘ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता’; शरद पवारांचं मोठं विधान
India australia pink ball test match review in marathi
‘गुलाबी’ आव्हानासाठी सज्ज; प्रकाशझोतातील कसोटी आजपासून; भारताचे आघाडी दुपटीचे लक्ष्य

प्रकाश आंबेडकरांबाबत काय म्हणाले राऊत?

“वंचित बहुजन आघाडीबाबत आम्ही विस्ताराने चर्चा झाली. प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत सहभागी करुन घेण्यावर आमचं एकमत झालं आहे. आज आम्ही महाराष्ट्रातल्या जागांवर चर्चा केली. वंचित आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणार आहे यात कुठलंही दुमत नाही.” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी युती केलीच होती. त्यानंतर त्यांचा प्रवेश महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत होणार का? हे पाहणं महत्त्वाचं होतं. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जी बैठक दिल्लीत पार पडली त्यात प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत घेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

Story img Loader