अयोध्येतील श्री राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामल्लाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्याला काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक नेते अनुपस्थित राहिले. दुसरीकडे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महादेवपुरा येथील प्रभू श्री रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं. यावेळी सिद्धरामय्यांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे. आम्ही गांधींच्या श्री रामाची पूजा करतो, भाजपाच्या श्री रामाची नाही, असं विधान सिद्धरामय्यांनी केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“भाजपा श्री रामाला, सीता आणि लक्ष्मणापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. लक्ष्मण आणि सीतेशिवाय श्री राम नाही. श्री राम फक्त अयोध्येपुरते मर्यादित नसून सर्वव्यापी आहेत. येथील मंदिरातही प्रभू श्री राम आहेत,” असं सिद्धरामय्यांनी म्हटलं.

हेही वाचा : अयोद्धेतील राममंदिर: रामरायाच्या ‘त्या’ दोन मूर्तींचे काय होणार? 

“आम्ही श्री रामाच्या विरोधात नाही”

“श्री राम सर्वांचे देव आहेत. ते फक्त भाजपा आणि हिंदूंचे देव नाहीत. आम्हीही श्री रामाचे शिष्य आणि भक्त आहोत. मीही अयोध्येला जाणार आहे. भाजपा आम्ही श्री रामाच्या विरोधात आहोत, असं चित्र दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पण, हे योग्य नाही. आम्ही श्री रामाच्या विरोधात नाही. भाजपा राजकारण करते,” अशी टीका सिद्धरामय्यांनी केली आहे.

हेही वाचा : राम कथा अनेक तरी राम नामाचे गारुड सारखेच; काय आहे कारबि रामायण?

दरम्यान, अयोध्येत श्री राम मंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा पार पडली. या सोहळ्याला संत, महंत, नेते, कलाकार, खेळाडू, उद्योगपती उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: We worship gandhis ram not bjps ram karnataka chief minister siddaramaiah ssa