Sadhguru Jaggi Vasudev supports Adani: संसदेचे हिवाळी अधिवेशन गोंधळात वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अदाणी समूहावर कारवाई, संभलमधील हिंसाचार, सत्ताधाऱ्यांकडून जॉर्ज सोरोस यांचा मुद्दा आणि राज्यसभेत विरोधकांनी सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यावर दाखल केलेला अविश्वासाचा ठराव यामुळे अनेकदा दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब झाले आहे. काँग्रेसने गौतम अदाणी यांच्यावर कारवाई करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. आता यावर आध्यात्मिक गुरू सद्गुरु जग्गी वासूदेव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आज त्यांनी एक्सवर पोस्ट करत आपले नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु यांनी केलेल्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले, “संसदेचे कामकाजात येत असलेले अडथळे पाहून निराशा वाटत आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला देश समोर येत असताना संसदेतील अशाप्रकारचे वातावरण निराशाजनक आहे. संपत्ती निर्माण करणारे आणि रोजगार देणाऱ्यांना राजकीय वादापासून दूर ठेवले पाहीजे. जर संसदेत काही अडथळे येत असतील तर त्याला कायद्याद्वारे सोडविले गेले पाहीजे. पण संसदेला अशाप्रकारे राजकीय आखाडा करणे चुकीचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतात व्यवसायाची वृद्धी होत राहिली पाहीजे. तरच भारताची प्रगती होईल.”

संसदेत गदारोळ का?

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून काँग्रेसने लोकसभेत गौतम अदाणी यांचा विषय काढत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा विषय उचलून धरला आहे. इंडिया आघाडीतील इतर पक्षांनी मात्र या विषयापासून अंतर राखले आहे. तर समाजवादी पक्षाने संभलमधील हिंसाचारावरून सरकारला धारेवर धरले आहे. तर राज्यसभेत सभापती जगदीप धनकड यांना हटविण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. २० डिसेंबर रोजी संसदेचे अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण अधिवेशन गोंधळातच संपणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे वाचा >> सोरॉस संबंधावरून काँग्रेसची कोंडी; भाजपकडून राहुल गांधी लक्ष्य; गदारोळाने कामकाज तहकूब

उपराष्ट्रपतींच्या विरोधात १० डिसेंबरला विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणला. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याशिवाय इंडिया आघाडीकडे कुठलाही पर्याय उरला नाही. कारण जगदीप धनकड हे सभागृहात विरोधी पक्षाला त्यांची बाजू मांडू देत नाहीत.

मोदी-अदाणी विरोधी जॅकेट घालून निदर्शन

संसदेच्या आवारात सलग चौथ्या दिवशी काँग्रेसने अदाणी लारखोरी प्रकरणी निदर्शने केली. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी अदाणी आणि मोदी यांना लक्ष्य करणारी जॅकेट घातले होते. या जॅकेटवर दोघांचे विमानातून एकत्र प्रवास करत असल्याचे छायाचित्र ढळकपणे छापलेले होते. ‘मोदी-अदाणी एक है, अदाणी सेफ है’ची टिप्पणी या टी-शर्टवर करण्यात आली होती. ‘मोदी अदाणी प्रकरणी चौकशी करू शकत नाहीत कारण त्यांनी चौकशी सुरू केली की, मोदींना स्वत:ला चौकशीला सामोरे जावे लागेल’, अशी टीका राहुल गांधींनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना केली.

सत्ताधाऱ्यांकडून जॉर्ज सोरोस यांचा विषय पुढे

दरम्यान अदाणी समूहाच्या लाचखोरीच्या चौकशीचा काँग्रेसने तगादा लावल्याने गुरुवारी (११ डिसेंबर) भाजपाने अमेरिकेतील अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरॉस यांच्या राहुल गांधींशी असलेल्या कथित लागेबांध्याचा मुद्दा संसदेत उपस्थित करून काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातून भाजपाने काँग्रेसविरोधात नवी आक्रमक रणनीती आखली असल्याचे दिसले.