प्रवास करताना सीटबेल्ट बांधला असता, तर गोपीनाथ मुंडे अपघातात बचावले असते अशी भावना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. 
झुंजार नेता
गाडीत मागे बसलेल्या व्यक्तींनी ‘सीटबेल्ट’ बांधला नाही तरी चालून जाते असा गैरसमज आपण बाळगतो परंतु, यातूनच घातक परिणामांना समोरे जाण्याची वेळ उद्भवते असेही हर्षवर्धन म्हणाले.
गोपीनाथ मुंडे यांचा अपघाताची घटना अतिशय दुर्देवी असून त्यांच्या जाण्याने देशाला मोठा फटका बसल्याचीही भावना हर्षवर्धन यांनी व्यक्त केली. मंगळावारी सकाळी अपघातानंतर गोपीनाथ मुंडे यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केल्यावर सर्वात प्रथम रुग्णालयात पोहोचून मुंडे यांच्या वैद्यकीय स्थितीची सविस्तर माहिती हर्षवर्धन यांनी माध्यमांना दिली होती.
नेहमीची ‘लेक्सस’ सोबत नसताना मुंडेंवर काळाचा घाला!

Story img Loader