हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. यासोबतच कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबच्या बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, या निर्णयापूर्वी बेंगळुरूमध्ये २१ मार्चपर्यंत सर्व प्रकारचे मेळावे, आंदोलनं, सार्वजनिक ठिकाणी निदर्शने किंवा उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

Live Updates
16:30 (IST) 15 Mar 2022
माझी सर्वात मोठी चिंता शिक्षण, कायदा कायदा आणि सुव्यवस्था – डीके शिवकुमार

कर्नाटक काँग्रेसचे आमदार डीके शिवकुमार यांनी या निकालावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, “हिजाब वादात माझी सर्वात मोठी चिंता शिक्षण आणि कायदा आणि सुव्यवस्था आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, परंतु शिक्षण, कायदा आणि सुव्यवस्था आणि जातीय सलोख्याची जबाबदारी कर्नाटक सरकावर अजूनही आहे.”

16:00 (IST) 15 Mar 2022
कर्नाटक उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे स्वागत – कर्नाटकचे शिक्षणमंत्री

कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आणि सकला मंत्री बीसी नागेश म्हणाले, “शालेय/महाविद्यालयीन गणवेश नियमांबाबत कर्नाटक उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निकालाचे मी स्वागत करतो. कायदा सर्वांपेक्षा वरचा आहे, हे आजच्या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय,” असं ते म्हणाले.

14:57 (IST) 15 Mar 2022
सरकारने मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत – एचडी देवेगौडा

हा न्यायालयाचा निर्णय आहे. राज्य सरकारने राजकीय पक्षांशी परस्पर चर्चा करायला हवी होती. हे प्रकरण मिटले नसून आणखी चिघळत आहे. सरकारने मुलींच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान आणि जेडी(एस) नेते एचडी देवेगौडा यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

14:41 (IST) 15 Mar 2022
हिजाब निकालावर संतापले असदुद्दीन ओवेसी

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. या हिजाब निकालावर हैदराबादचे खासदार आणि एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर वृत्त वाचा – “ब्राह्मणांसाठी जानवं आवश्यक, पण…;” हिजाब निकालावर संतापले असदुद्दीन ओवेसी

13:50 (IST) 15 Mar 2022
कर्नाटकातील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. हिजाब घालणे ही अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही, हिजाब हा इस्लामचा अविभाज्य भाग नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने निकाल देताना म्हटले आहे. या निकालाला विरोध करत कर्नाटकमध्ये मुलांनी परीक्षेवर बहिष्कार घातला आहे. सविस्तर वृत्त इथे वाचा – Hijab Verdict: कर्नाटकातील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार

13:44 (IST) 15 Mar 2022
राष्ट्रीय महिला आयोगाकडून निकालाचं स्वागत

“मी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करतो, कारण कुराणानुसार ही प्रथमतः धार्मिक प्रथा नाही. दुसरे म्हणजे, जेव्हा विद्यार्थी शैक्षणिक संस्थेत प्रवेश करतात तेव्हा त्यांनी तिथल्या नियमांचे पालन केले पाहिजे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

13:30 (IST) 15 Mar 2022
निकालामुळे मी निराश झालोय – काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी

“हिजाब प्रकरणातील निकालामुळे मी खूप निराश आहे. मी याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याची विनंती करतो आणि मी त्यासाठी मदत करण्यास तयार आहे.

प्रत्येक धर्मातील प्रत्येक बहिणीला तिच्या शालीनतेचे रक्षण करण्यासाठी तिला हवे असल्यास काहीही घालण्याचे स्वातंत्र्य नक्कीच असले पाहिजे,” असं काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी म्हटलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

13:08 (IST) 15 Mar 2022
चेन्नईत हिजाब निकालाविरोधात निदर्शने

चेन्नईतील न्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात निदर्शने केली. उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळून लावल्या आणि हिजाब घालणे ही इस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही, असं म्हटलंय.

https://platform.twitter.com/widgets.js

12:37 (IST) 15 Mar 2022
…हे न्यायालयांचे काम नाही, विद्यार्थी इस्लामिक संघटना संतापली

स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद अहमद यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “कोणत्याही श्रद्धेबद्दल काय आवश्यक किंवा अत्यावश्यक आहे याचा अर्थ लावणे हे न्यायालयांचे काम आहे, यावर आमचा विश्वास नाही. न्यायालयाने कायम ठेवलेल्या सरकारी आदेशामुळे त्रस्त झालेल्या मुस्लिम महिला विद्यार्थिनी या सर्वांसोबत आम्ही उभे आहोत आणि आम्ही सध्या संभाव्य उपायांबाबत कायदेशीर पर्याय शोधत आहोत.”

12:32 (IST) 15 Mar 2022
प्रत्येकाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे – कर्नाटकचे मुख्यमंत्री

“मुलांच्या हितासाठी प्रत्येकाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. हा आपल्या मुलांच्या भविष्याचा आणि शिक्षणाचा प्रश्न आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे,” असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

12:31 (IST) 15 Mar 2022
उच्च न्यायालयाच्या निकालाशी असहमत असणं हा माझा अधिकार – ओवेसी

मी हिजाबवर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी असहमत आहे. निर्णयाशी असहमत असणे हा माझा अधिकार आहे आणि मला आशा आहे की याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टाकडे अपील करतील, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवेसी यांनी दिली आहे. तसेच मी आशा करतो की नाही फक्त एमआयएम नाही तर, इतर धार्मिक गटांच्या संघटनांही या निर्णयावर अपील करतील, कारण या निर्णयाने धर्म, संस्कृती, भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार रद्द केले आहेत, असंही ओवेसी म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

11:55 (IST) 15 Mar 2022
न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं स्वागत – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी

“मुस्लिम मुलींना औपचारिक शिक्षणापासून दूर कसे ठेवायचे आणि त्यांना शिक्षण मिळू नये म्हणून तालिबानवादी विचारसरणीचा वापर करून हिजाबावरून गदारोळ करण्यात आला. न्यायालयाने दिलेला निर्णय भारतीय संविधान आणि समाजाच्या दृष्टीने पूर्णपणे योग्य आहे,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली.

https://platform.twitter.com/widgets.js

11:44 (IST) 15 Mar 2022
न्यायालयाने मूलभूत अधिकार काढून घेणं ही फसवणूक आहे – ओमर अब्दुल्ला

“कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निकालाने खूप निराश झालोय. आपण हिजाबबद्दल काहीही विचार करत असाल तरीही ते तिच्या कपड्यांबद्दल नाही. एका महिलेला कसे कपडे घालायचे आहेत हे निवडण्याचा तिचा अधिकार आहे. न्यायालयाने हा मूलभूत अधिकार कायम ठेवला नाही ही फसवणूक आहे,” असं नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

11:23 (IST) 15 Mar 2022
याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

कर्नाटक हायकोर्टाने याचिका फेटाळल्यानंतर आणि हिजाब घालणं अनिवार्य नसल्याचा निकाल दिल्यानंतर हे याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

11:22 (IST) 15 Mar 2022
कर्नाटक हायकोर्टाचा निकाल अत्यंत निराशाजनक – मेहबुबा मुफ्ती

उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, “कर्नाटक हायकोर्टाचा हिजाब बंदीचा निर्णय अत्यंत निराशाजनक आहे. एकीकडे आपण महिलांना सक्षम बनवण्याविषयी बोलतो तरीही आपण त्यांना केवळ धर्माचाच नाही तर, साध्या निवडीचा अधिकार नाकारत आहोत.”

https://platform.twitter.com/widgets.js

11:17 (IST) 15 Mar 2022
हा निकाल म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करणाऱ्यांना चपराक-उज्वल निकम

“कोर्टाचा निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय राज्यघटनेने नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलंय, त्याचा गैरवापर केला जातो. कोणतेही कपडे आपण घालू शकतो, या भावनेला या निकालाने चपराक दिली आहे, असं ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम म्हणाले. आपण सर्वांनी या निकालाचं स्वागत करायला हवं, कोर्टाचे असे निर्णय भारतीय लोकशाहीला बळकटी मिळेल,” असंही ते म्हणाले.

11:15 (IST) 15 Mar 2022
आपण कुठल्या काळात राहतोय, याचं भान ठेवायला हवं – शमशुद्दीन तांबोळी

हायकोर्टाचं निरीक्षण अत्यंत स्पष्ट व योग्य आहे. कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत. अनेक मुस्लीम देशांतही अनेक सामाजिक ठिकाणी बुरख्याला बंदी आहे. आपण कुठल्या काळात राहतोय या बाबतीत सगळ्यांनी भान पाळायला हवं, असं मुस्लीम सत्यशोधक समाजाचे शमशुद्दीन तांबोळी म्हणाले.

11:11 (IST) 15 Mar 2022
प्रत्येकाने हायकोर्टाचा आदेश मान्य करून शांतता राखावी – प्रल्हाद जोशी

“न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. मी सर्वांना आवाहन करतो की राज्य आणि देशाला पुढे जायचे आहे, प्रत्येकाने हायकोर्टाचा आदेश मान्य करून शांतता राखली पाहिजे. विद्यार्थ्यांचे मूळ काम म्हणजे अभ्यास करणे. त्यामुळे हे सर्व बाजूला ठेवून त्यांनी अभ्यास करावा,” असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जोशी म्हणाले.

https://platform.twitter.com/widgets.js

11:08 (IST) 15 Mar 2022
कोर्टाने दिलेला निर्णय अगदी योग्य – रजिया सुल्ताना

कोर्टाने दिलेला निर्णय अगदी योग्य आहे. जिथे महिलांच्या प्रगतीला अडथळा येत असेल, तर त्या परंपरा मोडायला हव्यात, असं सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना म्हणाल्या. हिजाब संदर्भातील आंदोलनाला राजकीय वळण दिलं गेलं, असं रजिया सुल्ताना म्हणाल्या.

11:05 (IST) 15 Mar 2022
शिक्षण का हिजाब महत्त्वाचं काय? मुसलमानांनी ठरवावं – हुसेन दलवाई

शिक्षण महत्त्वाचं की हिजाब महत्त्वाचं हे मुस्लिमांनी ठरवायला हवं आणि मुलींना शिक्षण द्यायला हवं. हिजाब महत्त्वाचा नाही, असं हुसेन दलवाई म्हणाले.

11:05 (IST) 15 Mar 2022
धर्म वैयक्तिकरित्या पाळा, सार्वजनिक ठिकाणी नको – चंद्रकांत पाटील

प्रत्येकाने आपला धर्म पाळावा, धर्मातील परंपरा पाळाव्या, पण ते वैयक्तिकरित्या पाळावं. सार्वजनिक ठिकाणी हिजाब घालण्याची गरज नाही, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी दिली.

वाद कोणत्या घटनेमुळे?
कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात हिजाब (हेडस्कार्फ)वरून वाद सुरू झाला. हिजाब घालून महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. कर्नाटक राज्य सरकारने जारी केलेल्या ड्रेस कोडबाबतच्या नियमानुसार हिजाब परिधान करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा कडक आदेश महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी देऊनही काही मुस्लीम विद्यार्थिनी आपल्या पालकांसह महाविद्यालयात आल्या असता त्यांना महाविद्यालयीन परिसराच्या बाहेर उभे करण्यात आले. त्यामुळे मुलींसह त्यांच्या पालकांनीही गेटबाहेर निदर्शने केली. त्याचवेळी या मुलींचा निषेध करण्यासाठी काही हिंदू विद्यार्थी भगवे उपरणे घालून महाविद्यालयाच्या परिसरात फिरत होते. त्यामुळे हा विषय अधिकच चिघळला.