West Bengal Assembly Election 2021 Results Live News: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसने २०० हून अधिक जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. तर दुसरीकडे कडवं आव्हान देत जोरदार प्रचार केलेल्या भाजपाच्या हाती मोठी निराशा आली आहे. भाजपाची शंभरी पूर्ण करतानाही दमछाक झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी विजयाची हॅटट्रिक साधल्याचं चित्र स्पष्ट आहे.

मात्र ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपाने सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आय़ोगाने पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली आहे. तसंच निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचाही इशारा दिला आहे.

Congress List for delhi assembly Election
Delhi Election : आता दिल्ली विधानसभेची धूम! काँग्रेसने जाहीर केली २१ उमेदवारांची यादी, अरविंद केजरीवालांसमोर तगडा उमेदवार!
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahul Gandhi And Arvind Kejriwal.
Delhi Election 2025 : काँग्रेसला हवी ‘आप’ची साथ, ‘हात’ मिळवण्यास केजरीवालांचा नकार
देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं? बावनकुळे म्हणाले... (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्रीपदी निवड करताना पडद्यामागे काय घडलं?
Ravindra Waikar And Amol Kirtikar
Ravindra Waikar : रवींद्र वायकरांची खासदारकी जाणार की राहणार? मुंबई उच्च न्यायालयाने राखून ठेवला निर्णय
महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : महायुतीला मिळालेली मते आणि जिंकलेल्या जागांमध्ये खरंच तफावत आहे का?
Sudhir Mungantiwar On Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? महत्त्वाची माहिती समोर
kumar ashirwad on Markadwad
“…तर भारतात बांगलादेशसारखी स्थिती झाली असती”, मारकडवाडीबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं वक्तव्य

पश्चिम बंगालमध्ये सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता होती. एकीकडे करोनाने कहर केलेला असतानाही मतदानावर याचा फारसा परिणाम झालेला पहायला मिळाला नव्हता. राज्यात ८४ लाख ७७ हजार मतदार असून ८० टक्के मतदान झालं. ममता बॅनर्जी गेल्या १० वर्षांपासून सत्तेत असून पश्चिम बंगालमधील जनता पुन्हा एकदा त्यांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत.

Live Blog

20:08 (IST)02 May 2021
बंगालचं चित्र स्पष्ट, मात्र नंदीग्रामचं नाही

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजयाची हॅटट्रिक झाली असून पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचं स्पष्ट आहे. मात्र ममता बॅनर्जींचा मतदारसंघ नंदीग्राममध्ये चित्र अद्यापही स्पष्ट नाही. ममता बॅनर्जी यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर भाजपा सुवेंदू अधिकारी यांचा विजय झाल्याचा दावा केला. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आय़ोगाने फेरमोजणी करण्याची मागणी केली आहे.

19:59 (IST)02 May 2021
नंदीग्राममध्ये पुन्हा मतमोजणी करा; ममता बॅनर्जींची मागणी

ममता बॅनर्जी यांनी हा लोकांचा विजय असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान नंदीग्राममध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडींवरुन त्यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणूक आयोग सूडाने वागत असल्याची टीका त्यांनी इंडिया टु़डेशी बोलताना केली आहे. निवडणूक आयोगाकडून आपल्याला त्रास दिला जात असून पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी केली असल्याचं सांगितलं आहे. 

19:42 (IST)02 May 2021
मोदींकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

पश्चिम बंगालमधील विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. पश्चिम बंगालमधील लोकांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तसंच करोना संकटाशी लढण्यासाठी केंद्राकडून शक्य ती सर्व मदत केली जाईल असं आश्वासन मोदींनी दिलं आहे. 

19:39 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जींचं कौतुक केल्याने चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना धमकीवजा इशारा

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. ममता बॅनर्जी झाशीच्या राणीप्रमाणे लढल्या अशा शब्दांत त्यांनी कौतुक केलं. दरम्यान छगन भुजबळ यांनी ममता बॅनर्जींचं कौतुक केल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिला आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

19:22 (IST)02 May 2021
रडीचा डाव!; शरद पवार संतापले

बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठिंबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला 'रडीचा डाव' एवढंच म्हणता येईल अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. 

19:07 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जी कोर्टात जाणार

मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार - ममता बॅनर्जी

18:49 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जींचा पराभव झाल्याचा भाजपाचा दावा

एकीकडे तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालेलं असताना दुसरीकडे ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये पराभव झाल्याचा भाजपाचा दावा आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांनी १६२२ मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला असं ट्विट भाजपा नेते अमित मालवीय यांनी केलं आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचा नैतिक हक्क नसल्याचं म्हटलं आहे. 

18:47 (IST)02 May 2021
तृणमूल काँग्रेसचं ट्विट करत आवाहन
18:44 (IST)02 May 2021
नंदीग्राममध्ये अद्याप मतमोजणी सुरु

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा विजय झाला आहे की पराभव यावरुन चर्चा सुरु असताना तृणमूलने अद्याप मतमोजणी सुुरु असून कोणतेही अंदाज व्यक्त करु नका असं आवाहन केलं आहे.

18:26 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जींची पत्रकार परिषद

भाजपाचा पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं. आम्ही निवडणूक आयोगाकडून खूप त्रास सहन केला असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. नंदीग्रामबद्दल चिंता करु नका, आम्ही एक लढा दिल्याने मला तिथे जास्त संघर्ष करावा लागला. तेथील लोक जो कौल देतील तो मला मान्य आहे. आम्ही २२१ हून जास्त जागा जिंकल्या असून भाजपाचा पराभव झाला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. 

18:22 (IST)02 May 2021
विजायनंतर ममता बॅनर्जींकडून तात्काळ करोना लढ्याला सुरुवात

या मोठ्या विजयासाठी आम्ही जनतेचे आभारी आहोत. मी तात्काळ करोनासंबंधित कामाला सुरुवात केली आहे. करोनामुळे  शपथविधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने केला जाईल असं ममता बॅनर्जी यांनी सांगितल आहे.

18:16 (IST)02 May 2021
बंगाल काँग्रेस आणि कम्युनिस्टमुक्त झाला - देवेंद्र फडणवीस

पश्चिम बंगालमध्ये भाजपाने तीन जागांवरुन मारलेली मजल मोठी आहे. पण ज्या बंगालमध्ये आमचं अस्तित्व नव्हतं तिथे तीन मुख्य पक्ष होते. पण बंगाल आता कम्युनिस्ट आणि काँग्रेसमुक्त झाला आहे. तिथे उजव्या विचारांना भक्कम पाया लाभला आहे अशी प्रतिक्रिया विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाविकास आघाडीचे नेते दुसऱ्याच्या घरी मूल झालं म्हणून ढोल बडवत आहेत, मिठाई वाटत आहेत. बेगानी शादीमे अब्दुल्ला दीवाना म्हणजे काय हे आज पाहिलं असा टोला यावेळी त्यांनी लगावला. मोदी आणि अमित शाह यांची लोकप्रियता कमी झालं असं नाही. या संदर्भातील उचित विश्लेषण केंद्रीय मंत्री करतील असंही त्यांनी सांगितलं. 

17:30 (IST)02 May 2021
उद्धव ठाकरेंकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम बंगालमधील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. 

"ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्याच्या हिंमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारं ममतादीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममतादीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाल जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सर्वांनी मिळून करोनाविरोधातील लढाईकडे लक्ष देऊया," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

17:16 (IST)02 May 2021
कोणीही विजयी मिरवणूक काढू नये - ममता बॅनर्जी

मला सर्वांचे आभार मानायचे आहेत. कोणीही विजयी मिरवणूक काढू नये अशी माझी विनंती आहे. सर्वांनी आपापल्या घरी जावं असं आवाहन ममता बॅनर्जी यांनी निवासस्थानाबाहेर जमलेल्या समर्थकांना केलं असून संध्याकाळी ६ नंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधेन अशी माहिती दिली. 

17:11 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जी यांनी मानले मतदारांचे आभार

नंदीग्रामचा निकाल लागल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी आपल्या निवासस्थानी उपस्थित कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांशी संवाद साधत मतदारांचे आभार मानले. तुम्ही माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल धन्यवाद अशा शब्दांत त्यांनी आभार मानले. 

17:02 (IST)02 May 2021
महाराष्ट्राचा उल्लेख करत राज ठाकरेंनी केलं ममतांचं अभिनंदन

देशभरामध्ये चर्चेत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे. पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा ममता बॅनर्जीच मुख्यमंत्री पदी विराजमान होणार हे आता जवळजवळ निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ममता यांना निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्यात. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर वृत्त

16:52 (IST)02 May 2021
राजनाथ सिंग यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पराभवानंतर भाजपाकडून पहिल्यांदाच मोठ्या नेत्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन करण्यात आलं आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विट करत ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. 

16:29 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जींचा विजय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला. 

15:26 (IST)02 May 2021
जखमी वाघिणीने एकहाती विजय मिळवला - संजय राऊत

पश्चिम बंगालच्या विजयाची मशाल संपूर्ण देशात एक नवा प्रकाश निर्माण करेल असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. एक स्त्री, एक जखमी वाघीण मैदानात उतरुन एकटी लढत होती, त्यांच्या पक्षाला उद्धवस्त केलं, नेत्यांना तोडलं, दबाव आणला, केंद्रीय यंत्रणांचा दवाब आणला. आपलेच लोक विरोधात उभे असतानाही बंगालची वाघीण मागे हटली नाही, लढत राहिली आणि ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हे संपूर्ण देश आणि राजकारणासाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दांत संजय राऊत यांनी कौतुक केलं आहे. 

15:20 (IST)02 May 2021
भाजपा ऑफिसच्या कार्यालयाची तोडफोड

कूच बेहर येथील भाजपा कार्यालयाची आणि उमेदवार मिहीर गोस्वामी यांच्या कारची तोडफोड करण्यात आली आहे. 

15:12 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जी पुन्हा एकदा पिछाडीवर सुवेंदू अधिकारींनी घेतली आघाडी

नंदीग्राम मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी व भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांच्या अटीतटीची लढत सुरू असल्याचं दिसत आहे. काही वेळापूर्वी आघाडीवर गेलेल्या ममता बॅनर्जींना आता शुभेंदु अधिकारींनी पुन्हा एकाद मुसंडी मारत पिछाडीवर टाकलं आहे. 

15:04 (IST)02 May 2021
बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींवर वारंवार झालेल्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलं - पार्थ चॅटर्जी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या विजय होत असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी म्हटले आहे की, ''बंगालची जनता ममता बॅनर्जींच्या सोबत आहे.  ममता बॅनर्जींवर आणि बंगालच्या लोकांवर करण्यात आलेल्या अपमानकारकर टिप्पणीला व हल्ल्यांना जनतेने चोख प्रत्युत्तर दिलं आहे.''

14:54 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची विजयाची हॅट्रीक होत असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. या पार्श्वूभीमवर आता त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादी काँग्रसेचे अध्यक्ष शरद पवार, पीडीपी प्रमुख महबुबा मुफ्ती यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

14:51 (IST)02 May 2021
तृणमूलचे मनोज तिवारी ३२ हजार मतांनी विजयी

हावडातील शिवपूर विधानसभा मतदारसंघातून टीएमसीच्या मनोज तिवारींना विजय मिळला आहे. क्रिकेटरचे नेता बनलेल्या मनोज तिवारी यांनी ३२ हजार मतांनी विजय मिळवला आहे. 

14:29 (IST)02 May 2021
भाजपा कार्यालयाबाहेर तृणमूल समर्थकांची मोठी गर्दी

पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं पाहून भाजपा कार्यालयाबाहेर तृणमूल समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. पोलीस यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

14:17 (IST)02 May 2021
तृणमूलचे सुजॉय बॅनर्जी पुरुलियामधून आघाडीवर

तृणमूल काँग्रेसचे नेते सुजॉय बॅनर्जी ११ हजार ५२२ मतांनी पुरुलिया मतदारसंघातून आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे नेते पार्थ बॅनर्जी यांचं आव्हान आहे. पार्थ बॅनर्जी ३२८३ मतांनी पिछाडीवर आहेत. 

13:59 (IST)02 May 2021
रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा

चार राज्यातील निवडणुका संपल्या आणि निकालही लागले. त्यामुळं आता पेट्रोल-डिझेलचे थांबलेले दर पुन्हा एकदा वाढू लागतात की काय आणि जनतेला आणखी महागाईच्या खाईत लोटतात की काय असं वाटू लागलंय असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. 

13:57 (IST)02 May 2021
पोलिसांनी समजावल्यानंतरही ममता समर्थकांचा गोंधळ

निवडणूक आयोगाने विजयी मिरवणुका आणि जल्लोष करण्यावर बंदी घातलेली असतानाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांनी समजावल्यानंतरही समर्थकांनी फटाके फोडत 'खेला होबे' च्या घोषणा दिला. 


13:53 (IST)02 May 2021
पश्चिम बंगाल निकालावर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

पश्चिम बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन करावी यासाठी भाजपा मैदानात उतरली होती. पण पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि भाजपाला सत्तेपासून जनतेने दूर ठेवले असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

13:24 (IST)02 May 2021
शरद पवारांकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शऱद पवार यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. यावेळी त्यांनी लोकांच्या भल्यासाठी तसंच करोनाशी लढण्यासाठी एकत्रित काम करुया असंही म्हटलं आहे. शरद पवार यांनी ट्विट केलं आहे. 

13:18 (IST)02 May 2021
निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली

निवडणूक आयोगाने कोणत्याही प्रकारे विजयी जल्लोष साजरा करण्यावर बंदी घातलेली असतानाही पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्यांकडून एकत्र येत सेलिब्रेशन करण्यात आलं. निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना याप्रकरणी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. 

12:49 (IST)02 May 2021
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची आघाडी

नंदीग्राममध्ये पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी १५०० मतांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर काँटे की टक्कर सुरु असून आतापर्यंत पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. 

12:33 (IST)02 May 2021
अमित शाह यांची खिल्ली

तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र समोर आल्यानंतर डेरेक ओब्रियन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खिल्ली उडवली आहे. डेरेक ओब्रियन यांनी अमित शाह यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये ते भाजपा २०० हून जास्त जागा जिंकू असा दावा करत आहेत. सविस्तर वृत्त 😇😇 pic.twitter.com/HgLVbq5Lni— Derek O'Brien | ডেরেক ও'ব্রায়েন (@derekobrienmp) May 2, 2021

12:21 (IST)02 May 2021
प्रशांत किशोर यांचं भाकीत खरं ठरणार? 'त्या' ट्विटची जोरदार चर्चा

ममता बॅनर्जी यांचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत भूषण यांनी बंगालमधील निकालाबाबत मोठी घोषणा केली होती. प्रशांत किशोर यांनी भाजपा दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही असं भाकीत वर्तवलं होतं. 


“माध्यमातील एक वर्ग भाजपाच्या समर्थनार्थ वातावरण तयार करत आहे. यातून हे स्पष्ट होतंय की भाजपा दोन अंकी संख्या पार करण्यासाठीही धडपडत आहे. माझं आवाहन आहे की, हे ट्विट जपून करून ठेवा आणि जर भाजपानं चांगलं प्रदर्शन केलं तर मी ट्विटर सोडून देईन,” अशी घोषणा किशोर यांनी केली होती.

सध्या येत असलेल्या कलांनुसार तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांच्या या ट्विटची चर्चा सुरु आहे. 

12:09 (IST)02 May 2021
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल २०० च्या पार

पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असून २०० च्या पुढे जागा मिळवत मोठ्या विजयाची शक्यता आहे. भाजपाला मात्र ८३ जागांवरच विजय मिळत असल्याचं चित्र आहे. 

11:59 (IST)02 May 2021
बाबुल सुप्रियो पिछाडीवर

भाजपा नेते आणि टॉलीगंज येथून उमेदवारी मिळालेले बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहे. यावर भाजपाचे महासचिवर कैलास वियजवर्गीय यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. "बाबुल सुप्रियो पिछाडीवर आहेत हे पाहून आश्चर्य वाटलं. सध्या काहीच बोलू शकत नाही. संध्याकाळपर्यंत आम्ही बहुमताचा आकडा पार करु असा विश्वास," असल्याचं ते म्हणाले आहेत.

11:21 (IST)02 May 2021
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना धक्का

फक्त पश्चिम बंगालच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या नंदीग्राम मतदारसंघात ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना भाजपाचे सुवेंदू अधिकारी कडवी झुंज देत आहेत. चौथ्या फेरीअखेर ममता बॅनर्जी सात हजार मतांनी पिछाडीवर असून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत. एकीकडे राज्यात तृणमूलला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता असताना दुसरीकडे मात्र ममता बॅनर्जी यांच्यावर पराभवाचं सावट आहे. 

11:15 (IST)02 May 2021
पराभव झाल्यास माझी जबाबदारी - भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष

प्रदेशाध्यक्ष दिलीप घोषण यांनी भाजपाचा विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. पराभव झाल्यास प्रदेशाध्यक्ष म्हणून ती आपली जबाबदारी असेल असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे. 

11:11 (IST)02 May 2021
ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर हालचाली

सर्व जागांचे कल हाती आले असून तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान यानंतर ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाबाहेर हालचाली सुरु झाल्या आहेत.ममता बॅनर्जींच्या निवासस्थानाबाहेर मोठा तंबू उभारण्यात आला असून मोठे स्क्रीनही लावण्यात आले आहेत. ममता बॅनर्जी प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 

10:53 (IST)02 May 2021
सुरुवातीचे कल हाती; तृणमूलला स्पष्ट बहुमत

पश्चिम बंगालमधील सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार तृणमूल काँग्रेस मोठी आघाडी घेण्याची शक्यता असून स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजपा ९३ जागांवर आघाडीवर आहे. 

Story img Loader