पश्चिम बंगालमधील हुगळी येथे प्रवाशांनी खचाखच भरलेली एक बस कालव्यात कोसळून ६ ठार तर २० जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास गोजारमोर परिसरातील डकातिया खाल नावाच्या कालव्यात पडल्याने झाला. पोलीस आणि स्थानिकांकडून बचाव कार्य सुरु असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#WestBengal: Death toll rises to 6 in Haripal bus accident https://t.co/pRy5YWbERN
— ANI (@ANI) October 16, 2018
ही बस नादिया जिल्ह्यातील करीमपूरहून बहरमपूरकडे जात होती. दौलताबादजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि रेलिंग तोडून बस थेट कालव्यात जाऊन कोसळली. अशाच प्रकारचा एक अपघात ऑगस्ट २०१७ मध्ये पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील तेहट्टा गावात झाला होता. तेव्हाही बस कालव्यात कोसळली होती. यात ८ जण ठार तर २५ जण जखमी झाले होते.