Kanchenjunga Express- Goods Train Accident West Bengal : पश्चिम बंगालमध्ये मालगाडीने कंचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने रेल्वेचा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास न्यू जलपाईगुडी येथे ही घटना घडली. दरम्यान, मालगाडीने धडक दिल्यानंतर कंचनजंगा एक्सप्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले होते.

हेही वाचा- रेल्वे प्रवास धोक्याचा? सिग्नल यंत्रणेबाबत मंत्रालयाचा धक्कादायक अहवाल

pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two bike riders die three injured in two separate accidents in Pune city
पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू, तिघे जखमी
Private bus accident at Tamhani Ghat 5 dead and 27 injured
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
woman died car hit Barshi, Barshi, car hit,
सोलापूर : बार्शीजवळ मोटारीची धडक बसून दुचाकीवरील महिलेसह दोघांचा मृत्यू
Loksatta editorial on Ferry boat accident in Mumbai
अग्रलेख: ‘बुडती’ हे जन…
Mumbai boat accident three members of Ahire family died from Pimpalgaon Baswant in Nashik
मुंबई : प्रवासी बोटीवर सुविधांचा अभाव
In last two days three accidents on the highway at Uran JNPA and Panvel
उरण, पनवेल जेएनपीए परिसरात कंटेनर अपघातांची मालिका

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, ही मालगाडी अगरतलावरून सियालदाह येथे जात होती. यावेळी या मालगाडीने न्यू जलपाईगुडी येथे रुळावर उभ्या असलेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली. ही धडकी इतकी जोरदार होती, की यावेळी कंचनजंगा एक्सप्रेसलाचे दोन डबे थेट रुळावरून खाली घसरले.

दरम्यान, या अपघातात आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ६० जण जखमी झाल्याची माहिती आहे. तसेच या ठिकाणी रेक्यू टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे रेल्वेमंत्री अश्विनीवैष्णव देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे जाहीर केलं आहे. तसेच जे लोक गंभीर जखमी आहेत, त्यांना अडीच लाख तर जे किरकोळ जखमी आहेत, त्यांना ५० हजार मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रेल्वेमंत्र्यांनीही दिली प्रतिक्रिया

तत्पूर्वी रेल्वेमंत्र्यांनी या अपघातानंतर सोशल मीडिया पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. न्यू जलपाईगुडी येथे झालेला अपघात दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. तसेच घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली होती. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वरिष्ठ अधिकारीही या ठिकाणी पोहोचले आहेत, असंही त्यांनी सांगितले होतं.

या अपघातासंदर्भात पंतप्रधान नरेंद्रे मोदी यांनीही प्रतिक्रिया दिली. पश्चिम बंगालमध्ये झालेला रेल्वेचा अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच जे लोक जखमी झालेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तसेच याप्रकरणी माझं अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून या ठिकाणी बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे, रेल्वे मंत्रीही लवकरच घटनास्थळी पोहोचणार आहेत. असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय पश्चिम बंगालच्या मुक्यमंत्री ममता बॅनर्जी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली होती. या घटनेचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. प्राथमिक माहितीनुसार कंचनजंगा एक्सप्रेसला मालगाडीने धडक दिली आहे. या अपघातानंतर जिल्हाधिकारी, डॉक्टर आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले आहेत, असे त्या म्हणाल्या.

Story img Loader