सर्वोच्च न्यायालयाकडून भाजपची मागणी अमान्य

rss bjp tussle ends maharashtra vidhan sabha election 2024
वादावर पडदा, RSS भाजपासाठी मैदानात; विधानसभेसाठी यंत्रणा कार्यान्वित!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supriya Sule Badlapur, Subhash Pawar Prachar,
सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका
mahavikas aghadi government in state was lost because of Sanjay Raut vishwajit Kadams criticism
संजय राऊतांमुळे राज्यातील आघाडीचे सरकार गेले, विश्वजित कदम यांची खोचक टीका
batenge toh katenge slogan by bjp in maharashtra assembly election
‘बटेंगे…’चा मुद्दा राज्यातील प्रचारात केंद्रस्थानी कसा आला? भाजप आक्रमक, विरोधक सावध?
congress rajya sabha mp abhishek manu singhvi at loksatta loksamvad event
आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय विरुद्ध सारे राजकीय पक्ष
Stone pelting at Narsayya Adam house in Solapur
सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक; आघाडीतील वादाला हिंसक वळण, काँग्रेसवर कारवाईची मागणी

पश्चिम बंगालमध्ये २७ फेब्रुवारी रोजी होत असलेल्या १०८ पालिकांच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निमलष्करी दले तैनात करण्याची पश्चिम बंगाल प्रदेश भाजपची मागणी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.

न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पीठाने भाजपनेते मौसमी रॉय आणि प्रताप बॅनर्जी यांच्या आव्हान याचिकांवर हा निर्णय दिला. कलकत्ता उच्च न्यायालयाने २३ फेब्रुवारी रोजी याप्रकरणी सांगितले होते की, राज्यातील या निवडणुकांसाठी केंद्रीय दले तैनात करायची की नाही, याचा निर्णय राज्य निवडणूक  आयोगाने घ्यावा.

पण या निकालाचे कारण न्यायालयाने दिले नव्हते.  

न्यायालयाने निर्देश दिल्यास केंद्र सरकार आपली दले पाठविण्यास तयार असल्याचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या २५ फेब्रुवारी २०२१च्या निकालाचा संदर्भ दिला. त्यावेळी न्या. चंद्रचूड यांच्याच नेतृत्वाखालील पीठाने त्रिपुरातील स्थानिक निवडणुकांसाठी केंद्राची अतिरिक्त कुमक पाठविण्यास मंजुरी दिली होती.  

न्या. सूर्यकांत यांचाही समावेश असलेल्या या पीठाने प. बंगालमध्ये केंद्रीय दले पाठविण्यास प्रतिकूलता दाखविली.