पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील हिंसाग्रस्त भागातील परिस्थिती शांततापूर्ण आणि नियंत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. यात विशेष करून सुती, समशेरगंज, धुलियन आणि जांगीपूर गावांचा समावेश आहे. या घटनेत आतापर्यंत १८० जणांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेअंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश या भागात अद्याप लागू आहेत. या भागातील दुकाने बंद असून, रस्ते निर्मनुष्य आहेत. इंटरनेट सुविधाही या ठिकाणी बंद आहे. सुरक्षा दलांकडून रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांची तपासणी होत आहे. हिंसाग्रस्त भागात शुक्रवारनंतर कुठल्याही प्रकारच्या हिंसक घटनेची नोंद झालेली नाही. वक्फ सुधारणा कायद्यावरून शुक्रवारी उसळलेल्या हिंसेत तीन जणांचा मृत्यू आणि अनेक जखमी झाले.
नवी दिल्ली : ‘वक्फ सुधारणा कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही,’ हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य योग्य नाही, असे विधान केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी केले. ‘बॅनर्जी यांनी असेच वक्तव्य नागरिकत्व सुधारणा कायद्यावेळी (सीएए) केले होते, पण त्या वेळी ‘सीएए’ बंगालमध्ये लागू झाला.