Prime accused in Murshidabad father-son murder arrested : पश्चिम बंगालमधील हिंसाचार झालेल्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका व्यक्ती आणि त्याच्या मुलाच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगाल पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने या आरोपीला अटक अटक केली आहे . पोलिस सूत्रांनी सांगितले की, हावडा जिल्ह्यातील डोमजूर परिसरात काल रात्री फेकरुल एसके उर्फ मोहक नावाच्या २४ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. इंडिया टुडेने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
हा आरोपी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील शमसेरगंज भागातील रहिवासी आहे. एसटीएफने दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीने पंडितांवर धारधार शस्त्राने हल्ला केला आणि १२ एप्रिल रोजी मुर्शिदाबाद येथे झालेल्या हिंसाचारात त्याने वडिल आणि मुलाची हत्या केली .
हा दुहेरी हत्याकांडानंतर फेकरुल शेख फरार होता. तो हावडा येथे जाऊन लपून बसाला आश्रय घेतला आणि डोमजूरमध्ये मजूर म्हणून काम करू लागला. अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या चौकशीदरम्यान त्याचे नाव उघड झाले होते. त्यांच्या जबाबाच्या आधारे, एसटीएफने डोमजूर परिसरात छापा टाकला आणि काल रात्री फेकरुलला अटक केली. या प्रकरणात पश्चिम बंगाल पोलिसांनी केलेली ही पाचवी अटक आहे.
वक्फ कायद्यातील सुधारणांविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुस्लिम समाजातील नागरिकांनी दान केलेल्या वक्फ मालमत्तांचे व्यवस्थापन करणाऱ्या वक्फ कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या कायद्याविरोधात पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद आणि दक्षिण २४ ररगणा जिल्ह्यात अनेक भागात हिंसाचार झाला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. यावेळी हिंसाचारात अनेक हिंदूंची घरे तोडण्यात आली होती.
नेमकं काय झालं होतं?
११ एप्रिल रोजी हरोगोबिंदो दास (७०) आणि त्यांचा मुलगा चंदन (४०) यांचे मृतदेह अनेक वार केलेल्या अवस्थेत जाफ्राबाद येथे आढळून आले होते. या हत्येप्रकरणी तीन जणांना अटक करण्यत आली आहे. दरम्यान भीतीमुळे पुजारी हजर न राहिल्याने कुटुंबाला वडील-मुलाचे अंतिम संस्कार स्वतःच करावे लागले, असे एका वृत्तात म्हटले आहे.