पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे जमावाने मृत मुलाच्या हातून एका अल्पवयीन मुलीच्या भांगेत सिंदूर भरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंदू रिवाजाप्रमाणे लग्न झाल्यानंतर पती पत्नीच्या भांगेत सिंदूर भरण्याची प्रथा आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील वर्धमान येथील कांतापुकूर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलगा आणि मुलीचं एकमेकांवर प्रेम होतं. दोघांची जात वेगळी होती. तसेच अल्पवयीन असल्याने मुलीच्या आईने लग्नास नकार दिला होता. त्यामुळे मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला. त्यानंतर मुलाने आपली जीवनयांत्रा संपवली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्या मुलाचं पार्थिव शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर पार्थिव घरी आलं आणि या घटनेला वेगळंच वळण लागलं. शेजारी राहणाऱ्या जमावाने मुलीच्या घरावर दगडफेक केली. या मृत्यूबद्दल त्यांना आधीच माहिती होतं असा आरोप जमावाने केला. तसेच त्याला वाचवण्यासाठी काहीच प्रयत्न केलं नाही. आत्महत्येपूर्वी मुलाने त्या मुलीला फोटो पाठवल्याचा आरोपही जमावाने केला. त्यानंतर संतप्त जमावाने मुलगी आणि तिच्या आईला जबर मारहाण केली. मुलीकडे मुलाच्या आईचा फोन नंबर होता. ती तिला कळवू शकत होती, असा जाबही उपस्थित जमावाने विचारला. त्यानंतर जमावातील काही जणांनी पुढे येत अल्पवयीन मुलीला खेचत आणलं आणि मृत मुलाच्या हातून जबरदस्तीने भांगेत सिंदूर भरलं. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं.

चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी!

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीच्या आईने या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखलं केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.