दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे नराधम पतीने तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर श्रद्धा वालकरप्रमाणे त्यानेही पत्नीचे तुकडे केले आणि मृतदेह महानंदा नंदीत फेकून दिला. पोलिसांनी आरोपी पती मोहम्मद अंसारुलला अटक केली असून पत्नी रेणुका खातूनच्या मृतदेहाचा शोध सुरु केला आहे. खूप शोध घेतल्यानंतर पोलिसांना एका सुटकेसमध्ये मृतदेहाचे धड मिळाले, पण शीर आणि इतर अवयव अजूनही मिळालेले नाही.
हे ही वाचा >> श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे विचलीत झाल्याने तुनिषापासून विभक्त झालो, शिझान खानचा दावा
पीटीआय या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दार्जिलिंग जिल्ह्याच्या सिलीगुडी येथे राहणाऱ्या रेणुका खातून या अनेक दिवसांपासून बेपत्ता होत्या. रेणुकाच्या नातेवाईकांनी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पोलिसांना याची माहिती देऊन तक्रार दाखल केली. रेणुका साडपत नसल्यामुळे पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरु केला. तपास करत असताना पोलिसांचा पतीवर संशय बळावला.
आरोपी पतीचे नाव मोहम्मद अंसारुल असे आहे. पोलिसांच्या चौकशीत अंसारुल आपला जबाब सतत बदलत होता. जेव्हा पोलिसांनी आपला खाक्या दाखविला तेव्हा आरोपीने गुन्हा मान्य करत सर्व सत्यता सांगितली. अंसारुलला आपल्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीबरोबर संबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे त्याने पत्नीला संपविण्याचा निर्णय घेतला. २४ डिसेंबर रोजीच त्याने रेणुकाची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन तिला महानंदा नदीत फेकून दिले.
हे ही वाचा >> परधर्मीय पुरुषाने मुलीवर अन्याय करायचा नाही, आणि स्वधर्मातील पुरुषाने केला तरी चालेल, असं आहे का?
मृतदेहाचा अजूनही शोध सुरु
रेणुका खातूनच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार रेणुकाचे अंसारुलसोबत सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. सिलीगुडी येथील दादाभाई कॉलनीमध्ये दोघेही राहत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातील त्या दोघांमध्ये थोडं भांडणं होत होते, मात्र कालांतराने त्यांनी आपल्यातले गैरसमज बाजूला सारुन संसार नव्याने सुरु केला होता. मात्र तिची अचानक हत्या झाल्यामुळे नातेवाईकांनाही धक्का बसला आहे. पोलिसांना एका बॅगेत तिच्या मृतदेहाचे तुकडे मिळाले आहेत. आरोपी अंसारुलला फाशीची शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी तिचे नातेवाईक करत आहेत.