वृत्तसंस्था, नवी दिल्ली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जो देश पाश्चिमात्य देशांचे नियम पाळत नाही, ते त्याला शत्रू ठरवून त्याचा अपप्रचार करतात, भारताबाबतही असेच करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी टीका रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी केली. 

पाश्चात्य उच्चभ्रूंचे आंधळेपणाने अनुकरण करण्यास तयार नसलेल्या प्रत्येकाला ते ‘शत्रू’ ठरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ठराविक वेळी, त्यांनी भारताशीही असेच करण्याचा प्रयत्न केला. अर्थात आताही ते डिवचत आहेत, असेही पुतिन म्हणाले.  भारताव्यतिरिक्त, पाश्चात्य देशांनी चीन आणि अरब देशांनाही तशीच वागणूक दिल्याची टीका पुतिन यांनी केली.

हेही वाचा >>>राष्ट्रीय अध्यक्ष मीच! पवारांचा पुनरुच्चार : निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी

मोदी सरकारची स्तुती

सोची येथे मुख्य वार्षिक भाषणादरम्यान, पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारचे कौतुक केले आणि ते म्हणाले की मोदी यांचे नेतृत्व स्वयंनिर्देशित असून ते राष्ट्रीय हीत साधते. भारतासारखे देश संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी जागेसाठी पात्र आहेत. भारताबरोबर ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका हेही देश जास्त प्रतिनिधित्वास पात्र आहेत, असेही पुतिन यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western countries attempt to make india an enemy russian president vladimir putin amy