येमेनच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी अडेनमधून आयसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून सात जणांना अटक केली असून त्यामध्ये एका पाश्चिामात्य मुस्लिमाचा समावेश आहे, असे पोलिसांनी सांगितले.
सरकारने आयसिस आणि अल-कायदाविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली असून सात जणांना करण्यात आलेली अटक हा त्याचाच एक भाग आहे. आयसिस आणि अल-कायदाने गेल्या काही महिन्यांत येमेनवर भीषण हल्ले चढविले आहेत. येमेनच्या अधिकाऱ्यांनी आयसिसशी संबंधित सात जणांना एडनच्या मनसुरा जिल्ह्य़ातून अटक केली असून त्यामध्ये एक पाश्चिमात्य मुस्लीम आहे. सरकार समर्थक दले आणि इराण समर्थक बंडखोर यांच्यात गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू असून त्याचा फायदा आयसिस आणि अल-कायदाने उठविला आहे.

Story img Loader