”सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की महाराष्ट्र मॉडेल संपूर्ण देशात लावावं, तुम्ही लावाल का? हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे की, मुंबई मॉडेलचा तुम्ही वापर करा. हा चेन्नई उच्च न्यायालयाचा आदेश आहे की मुंबई मॉडेला तुम्ही ऑक्सिनज वितरण आणि कोविड सेंटरबाबत म्हटलं आहे, तुम्ही वाचा एकदा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश. तुम्हा काय मला सांगता महाराष्ट्र…तुम्ही एकदा येऊन पाहा महाराष्ट्राचं सरकार काय करत आहे.” असं म्हणत आज राज्यसभेत बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्यांवर व मोदी सरकार निशाणा साधला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
तसेच, ”लॉकडाउन सुरू आहे, लॉकडाउन सुरूच राहील. मात्र व्यापक लसीकरण… आपल्या देशात आतापर्यंत आपण किती लसीकरण केलेलं आहे. १२५ कोटी लोकसंख्येचा देश आहे, किती टक्के लसीकरण आपण केलेलं आहे? आजही संपूर्ण देशात लसीकरणाचा तुटवडा आहे. आज देखील लसीकरण केंद्रावर लोक लसीसाठी गोंधळ घालत आहेत आणि आपण सहा कोटी लसी परदेशात पाठवल्या. आपण ९ हजार मेट्रीक टन ऑक्सिजन परदेशात पाठवला. यामुळे आपल्या आरोग्य यंत्रणेची संपूर्ण पोलखोल झाली आहे. आता आपण तिसऱ्या लाटेबद्दल बोलत आहोत, तर तिसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी आपली काय तयारी आहे? आपण रुग्णालयांमध्ये किती बेड वाढवले आहेत? आपण किती डॉक्टर, नर्स तयार केले आहेत? ऑक्सिजनचे किती प्लॉन्ट उभारले आहेत, किती व्हेंटिलेटर्सची खरेदी केली आहे? रूग्णवाहिका किती आणल्या आहेत?आणि औषधांचे काय नियोजन केले आहे? हे तुम्हाला सांगावं लागेल.” असा प्रश्नांचा भडीमार संजय राऊत यांच्याकडून यावेळ मोदी सरकारवर करण्यात आला.
याचबरोबर ”मृतदेहांचा अपमान नाही झाला पाहिजे. ते बेकायदेशीर आहे व दंडनीय अपराध आहे. परंतु आपण हजारो मृतदेहांना अशाप्रकारे पुन्हा एकदा मारलं आहे, दाबलं आहे व अपराध केला आहे. ही कोणाची जबाबदारी आहे? मी कोणा एका व्यक्तीस किंवा सरकारला दोष देत नाही, मुद्दा यंत्रणेचा आहे आणि यंत्रणेमागे जो व्यक्ती आहे, त्यांच्या बद्दल आहे. मात्र सरकारला आमचा प्रश्न आहे की, तुम्ही संख्या का लपवत आहात? किती लोक आमच्यापासून दुरावले हे तुम्ही सांगा, खरी संख्या सांगा, जे रिपोर्ट्स आहेत, ते सरकारी संख्येपेक्षा जास्त आहे.” असं देखील संजय राऊत राज्यसभेत आज म्हणाले आहेत.
Our question is to govt — why are you hiding the data? Tell us, how many people have lost their lives (due to COVID). Reports say more (deaths) than govt’s official figures: Shiv Sena MP Sanjay Raut, in Rajya Sabha pic.twitter.com/tiC9BJbW5W
— ANI (@ANI) July 20, 2021
दरम्यान,‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने हा विषय चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातही पेगॅससच्या वापराबाबत वक्तव्य केलं आहे.
Pegasus Snoopgate : महाराष्ट्रातही पेगॅससचा वापर?; संजय राऊतांकडून गंभीर आरोप; म्हणाले…
“इस्त्रायल हा भारताचा मित्र आहे आणि माजी पंतप्रधान नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांचे मिठ्या मारतानाचे फोटो सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले आहेत. पेगॅससचा भारतीय लोकशाहीला धोका आहे आणि देशाची बदनामी आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये कारण नेत्यानाहूंच्या प्रचाराला मोदींचे पोस्टर लागले होते. या देशातल्या पत्रकारांह हजारो प्रमुख लोकांसह फोन रेकॉर्ड झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्यामाऱ्या बंद करणं थांबवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. हा जनतेशी विश्वास घात आहे. आज आमची नावं दिसत नसली तरी ती त्यात असणार आहेत याची आम्हाल खात्री आहे. महाराष्ट्रातील अनेक नावे त्यात असण्याची शक्यता आहे” असे राऊत म्हणाले आहेत.