राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित तरूणीचा आज (शनिवार) पहाटे सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाल्याने, आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी ही मागणी जोर धरू लागली आहे. परंतू फाशीच्या शिक्षेमुळे खरंच पीडित तरूणीला न्याय मिळेल का? देशभरात रोज होणा-या बलात्कारांच्या घटनांना यामुळे खरंच आळा बसेल का? देशाच्या कायद्यांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे, की समाजाच्या मानसिकतेमध्ये? बलात्कारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करायला हव्यात असे तुम्हाला वाटते. मुख्य म्हणजे या उपाययोजनांमागील विचार हा भावनिकदृष्ट्या नव्हे तर सर्वांगीण विचार करून घेण्यात आलेला असावा ही आशा.

Story img Loader