भारत जोडो यात्रेने एक वेगळा दृष्टीकोन दिला आहे. भाजपा आणि संघाने तिरस्कार आणि अहंकराचा दृष्टीकोन दिला. मात्र आम्ही बंधुभावाचा दृष्टीकोन घेऊन ही भारत जोडो यात्रा काढली होती. भारत जोडो यात्रेमुळे देशापुढे दोन मार्ग निर्माण झाले आहेत. त्यातला एक मार्ग लोकांना तोडण्याचा, तिरस्कार पसरवण्याचा मार्ग आहे. दुसरा मार्ग लोकांना जोडण्याचा आहे. या यात्रेचा परिणाम काय होईल हे मी आत्ता सांगू शकत नाही. आम्ही काढलेली ही यात्रा संपलेली नाही. ही एक नवी एक सुरूवात आहे असं राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही भूमिका मांडली होती. आमच्या यात्रेने देश जोडण्याचं काम केलं. भारताने आता पुढे कसं गेलं पाहिजे हे या भारत जोडो यात्रेने देशाला सांगितलं असं मला वाटतं असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
भारत जोडो यात्रेत आम्ही अनेक प्रश्न घेऊन उतरलो होतो
भारतात आज घडीला अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, काश्मिरी पंडितांचा प्रश्न, भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न आज घडीला आहे. कलम ३७० वर राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. आम्ही आमच्या कार्यकारिणीमध्ये आमची भूमिका काय आहे त्यात काँग्रेसची भूमिका काय ते आम्ही सांगितलं आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ही यात्रा संपली आहे असं समजू नका. आज श्रीनगरमध्ये यात्रा संपली आहे आमच्यासोबत लोक अनेक चालले आहेत. ही यात्रा दक्षिणेकडून उत्तरकडे गेली मात्र यात्रेचा परिणाम संपूर्ण देशावर झाला आहे. कारण आम्ही एक नवं व्हिजन देशाला देऊ शकलो आहोत असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
यात्रेचा दुसरा भाग असणार का?
काँग्रेस पक्षाने आणि आमच्या कार्यकर्त्यांनी इतर राज्यांमध्येही यात्रा काढली होती. यात्रेचा दुसरा भागही असेल का? हे आत्ता सांगणं थोडं घाईचं होईल. मात्र माझ्या काही संकल्पना आहेत. देशात राजकीय पक्ष आणि जनता यांच्यात काहीसं अंतर पडलं आहे. मी हे अंतर कमी करण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली होती. रस्त्यावर चालून आपण लोकांना भेटू शकतो, त्यांच्यातले एक होऊ शकतो. त्याच उद्देशाने मी यात्रा काढली होती. देशाला एका नव्या राजकीय दृष्टीकोनाची गरज आहे ते आम्ही देण्याचा प्रयत्न भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरची अवस्था वाईट
जम्मू आणि काश्मीरची परिस्थिती पाहून मला वाईट वाटलं. आत्ता ही जी परिस्थिती आहे ती मला अपेक्षित नव्हती. मला इथली परिस्थिती पाहून वेदना झाली. मला इथल्या लोकांबाबत कायमच आकर्षण वाटत आलं आहे. मी इथे माझ्या परिने जी मदत करता येईल त्याच उद्देशाने आलो होतो. मला जम्मू काश्मीरमध्ये जो आदर मिळाला त्यामुळे मी इथल्या लोकांचा ऋणी आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
भारत जोडो यात्रेला देशात खूप चांगला प्रतिसाद
भारत जोडो यात्रेला देशाने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. लोकांनी आम्हाला खूप चांगला प्रतिसाद दिला. जिथे जिथे गेलो तिथे लोक आमच्या यात्रेत सहभागी झाले आहेत. आम्ही अनेक विषय घेऊन या यात्रेत उतरलो होतो आणि लोकांशी संवाद साधण्यात यशस्वी झालो असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.