“भिन्नलिंगी जोडप्याचं मूल जेव्हा घरगुती हिंसाचार पाहतं तेव्हा काय होतं?” समलिंगी जोडप्याने दत्तक मूल घेण्याच्या चिंतेनंतर वक्तव्य
भारताचे मुख्य सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी समलिंगी विवाहांविषयीच्या याचिकांवर सुनावणी होत होती त्यावेळी गुरुवारी त्यांनी समलिंगी जोडप्यांनी मूल दत्तक घेण्याच्या चिंतेबाबत आपलं मत मांडलं आहे. चंद्रचूड यांनी जे म्हटलं आहे ते वक्तव्य चर्चेत आहे.
काय म्हटलं आहे सीजेआय चंद्रचूड यांनी?
जेव्हा भिन्नलिंगी जोडप्याचं मूल घरगुती हिंसाचार पाहतं तेव्हा काय होतं? काय होतं जेव्हा सामान्य वातावरणात एखादा मुलगा घरगुती हिंसाचार पाहतो. जेव्हा तो मुलगा आपल्या वडिलांना दारू पिऊन आल्यावर आईला रोज मारताना पाहतो. दारु पिण्यासाठी पैसे मागताना, दमदाटी करताना पाहतो. त्यावेळी त्या मुलावर काय परिणाम होत असेल? असा प्रश्न चंद्रचूड यांनी विचारला आहे. माझं म्हणणं असं आहे की कुणीही परिपूर्ण नसतो. मला यावरून ट्रोल केलं जाईल हे मला माहित आहे तरीही मी हे मत मांडतो आहे असंही चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.
सुनावणी दरम्यान चंद्रचूड यांनी असं म्हटलं आहे की आपण जी मतं मांडतो त्यावरून ट्रोल केलं जातं. न्यायाधीशांना हे देखील सहन करावं लागतं असं म्हणत त्यांनी चिंता व्यक्त केली. सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी समलिंगी जोडप्यांनी मुलांना दत्तक घेण्याच्या मुद्द्यावर मत मांडलं.
ट्रान्सजेंडर अधिकार आणि हक्क यासाठी काम करणारे कार्यकर्ते जैनब पटेल यांच्या वतीने वरिष्ठ अॅडव्होकेट के. व्ही. विश्वनाथन यांच्याद्वारे जे पुरावे सादर केले ते पाहिल्यानंतर समलिंगी जोडप्यांबाबत चंद्रचूड यांनी ही टिप्पणी केली.