बॉलीवुड अभिनेता अनुपम खेर यांना नुकत्याच घोषित करण्यात आलेल्या पद्म पुरस्कारावर ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता पद्म पुरस्काराच्या निवडीबाबत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
बॉलीवूड अभिनेता कादर खान यांनी अनुपम खेर यांना पद्म पुरस्कार घोषित करण्यावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कादर खान म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करण्याव्यतिरीक्त अनुपम खेरने काय केलेय जो त्याला पद्म पुरस्कार देण्यात येत आहे. मला पद्मश्री पुरस्कार मिळाला नाही ते बरं झाल. मी कधीच कोणाच्या आयुष्यात हस्तक्षेप केला नाही आणि करणारही नाही. इंडस्ट्रीमधील लोकांना फक्त याच कारणामुळे हा पुरस्कार दिला जात असेल तर मला असा पुरस्कार नकोच. पुरस्कार मिळणे ही काही मोठी गोष्ट नाही पण, तो कोणाला प्रदान केला जातोय या गोष्टीवर त्याचे महत्त्व अवलंबून असते. लोक आता इतरांचा आदर करणे विसरले असून, ते स्वार्थी झाले आहेत. यावर्षी या पुरस्कारासाठी ज्या नावांची घोषणा करण्यात आली आहे त्यांच्याइतका मी सक्षम नाही असे मला वाटते. पण ज्यांनी पद्म पुरस्कारासाठी माझे नाव सुचविले होते त्या सर्वांचा मी आभारी आहे.
कादर खान यांच्या या वक्तव्यावर अनुपम खेर काय प्रतिक्रिया देतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Story img Loader