एका बाजूला काही भाजप नेते ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उपस्थित करून चिंता व्यक्त करत असताना देशाच्या गृहमंत्र्यांनी मात्र, ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय? अशी प्रश्नात्मक प्रतिक्रिया देत याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे वक्तव्य केले आहे.
‘लव्ह जिहाद’चा अर्थ मुलींना समजावून सांगा – मोहन भागवत
‘लव्ह जिहाद’च्या प्रश्नावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी राजनाथ यांना त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता, स्मितहास्य करत ‘लव्ह जिहाद’ म्हणजे काय? असा उलट सवाल केला. तसेच याबद्दल काहीच माहिती नसल्याचेही ते म्हणाले. दुसऱयाबाजूला भाजप नेते लक्ष्मीकांत वाजपेयी आणि खासदार योगी आदित्यनाथ यांनी ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा उचलून धरला आहे.
उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत ‘लव्ह जिहाद’च्या मुद्यावर भर दिल्याशिवाय राहणार नाही, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले होते.
मुस्लीम युवकांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश नको
‘लव्ह जिहाद’मागे सिमी आणि लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटना सक्रिय असून हिंदू मुलींना प्रेमात फसवून त्यांच्याशी विवाह केल्यानंतर त्यांचे धर्मांतर करण्यासाठी दबाव आणण्याच्या घाट यातून घातला जात असल्याचा मुद्दा भाजप नेतेच उपस्थित करत असताना केंद्रीय गृहमंत्र्यांनी मात्र, ‘लव्ह जिहाद’बाबत काहीच माहित नसल्याची प्रतिक्रिया देणे विसंगत मानले जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा