अधिकृतपणे देशाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा जोरदार रंगू लागली आहे. इंडियाचे नाव बदलून भारत करण्याची चर्चा सुरू असतानाच संयुक्त राष्ट्रानेसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. संयुक्त राष्ट्रात इंडियाचे नाव बदलून भारत ठेवण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करू, असे संयुक्त राष्ट्राच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. G20 शिखर परिषदेच्या निमंत्रण पत्रावर ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिलेले पत्र व्हायरल झाल्यानंतर इंडिया विरुद्ध भारत अशी चर्चा सुरू झाली आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांना इंडियाचे भारत करण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव आल्यास काय होणार, असे विचारले असता ते म्हणाले, असा प्रस्ताव आल्यास विचार केला जाईल. तुर्कीने आपले नाव बदलून तुर्कीये ठेवल्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या औपचारिक विनंतीला सहमती दिल्याचे उदाहरणही त्यांनी दिले.

What Omar Abdullah Said?
India Alliance “..तर इंडिया आघाडी बंद करा”; ओमर अब्दुल्लांंचं वक्तव्य, आघाडीत वादाच्या ठिणग्या का पडत आहेत?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
Ajit Pawar discussion with Amit Shah in Delhi
अजित पवारांची दिल्लीत अमित शहांशी चर्चा
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”
Loksatta editorial US National Security Advisor Jake Sullivan Nuclear deal Narendra Modi
अग्रलेख: अणू हवा,‘अरेवा’ नको!
Chhagan Bhujbal On Devendra Fadnavis
Chhagan Bhujbal : देवेंद्र फडणवीसांनी भेटीवेळी तुम्हाला मंत्रिपदाचा शब्द दिला आहे का? भुजबळांचं मोठं भाष्य; म्हणाले, “मला मंत्रिपदाबाबत…”
Maharashtra Mumbai News Live Updates in Marathi
“शरद पवार-अजित पवार एकत्र आले तर…”, प्रफुल पटेल यांचं मोठं विधान

हेही वाचाः काय सांगता! आता UPIच्या मदतीने काढता येणार ATM मधून पैसे, आनंद महिंद्रा यांनी शेअर केला VIDEO

फरहान हक यांनी इंडियाचे नाव बदलून भारत करण्याच्या वृत्ताच्या आधारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘तुर्कस्तानच्या बाबतीत तेथील सरकारने आम्हाला दिलेल्या औपचारिक विनंतीनंतर ही कारवाई करण्यात आली. साहजिकच जर आम्हाला अशा विनंत्या आल्,या तर आम्ही त्यांचा नक्कीच विचार करू. इंडिया विरुद्ध भारत या मुद्द्यावर विरोधक एका सुरात निषेध नोंदवत आहेत.

हेही वाचाः २२० सभा, ६० शहरे अन् १५ दशलक्ष लोक, अशा प्रकारे जी २० देशाची अर्थव्यवस्था बदलणार

G20 निमंत्रण मेजवानी व्यतिरिक्त पंतप्रधान मोदींच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या प्रेस नोटवर भारताचे पंतप्रधान देखील लिहिले गेले होते, ती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शेअर केली होती. G20 च्या भारतीय प्रतिनिधींच्या ओळखपत्रांवरही भारत हा शब्द नमूद करण्यात आला आहे.

Story img Loader