Independence Day 2023 : भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यादिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालकिल्ल्यावरून देशाला संबोधित केलं आहे. यावेळी त्यांनी जनतेच्या मनातील देशप्रेम जागवण्याचं काम केलं. तसंच, पुर्वजांनी आपल्याला दिलेल्या काही गोष्टींचा उल्लेख करत आगामी १ हजार वर्षाचा दृष्टीकोन भारतीयांना दिला.
“भारताच्या अमृत काळातील हे पहिले वर्ष आहे. या कालखंडमध्ये आपण जे काही करू, जी पाऊल उचलू, जितका त्याग करू, जितकं परिश्रम करू, सर्वजनहिताय, सर्वजनसुखाय निर्णय घेऊ, येणाऱ्या १ हजार वर्षात देशाचा स्वर्निम इतिहास यामुळे अनुकूल होणार आहे. या कालखंडात घडणाऱ्या घटनांचा आगामी १ हजार वर्षासाठी प्रभाव पडणार आहे. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला देश पंचप्राण समर्पित करून नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हेही वाचा >> पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून मणिपूर हिंसाचारावर भाष्य; म्हणाले, “आई-बहिणींच्या…”
“नव्या संकल्पांना सिद्ध करण्यासाठी मनापासून लढत आहे. माझी भारत मातेत सर्व ऊर्जांचं सामर्थ्य आहे. १४० कोटी लोकांच्या ऊर्जेने, इच्छेने, चेतनेने पुन्हा एकदा आपली भारता माता जागृत झाली आहे. या कालखंडात गेल्या ९-१० वर्षांत आपण अनुभवलं की जगभरात भारताच्या चेतनेप्रती, सामर्थ्याप्रती नवं आकर्षण, नवा विश्वास, नवी आशा निर्माण झाली आहे. प्रकाश पुंज भारत जगासाठी एक दिशा ठरली आहे. विश्वाला या भारतात एक ज्योती दिसतेय. जगाला एक नवा विश्वास निर्माण होतोय”, असाही विश्वास मोदींनी आज दिला.
“आपलं सौभाग्य आहे की आपल्या आपल्या पूर्वजांनी आपल्याला काही गोष्टी दिल्या आहेत. आज आपल्याकडे डेमोग्रासी आहे, आज आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. आज आपल्याकडे डायव्हरसिटी आहे. डेमोग्रासी, डेमोक्रेसी आणि डायव्हरसिटी या त्रिवेणींमध्ये भारताच्या प्रत्येक स्वप्नाला साकार करण्याचं सामर्थ्य आहे, असंही मोदी म्हणाले.
सर्वाधिक तरुण भारतात
जगभरातील देशात लोकांचे वय कमी आहे. भारतात तरुणांची ऊर्जा वाढत जातेय. गौरवाचा कालखंड आहे की तीस वर्षांपेक्षा कमी लोकसंख्या भारतात सर्वाधिक आहे. तीस वर्षांपेक्षा कमी वय असलेला तरुण माझ्या देशात आहे, असंही मोदी म्हणाले.