Reliance AGM 2022: देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. विशेषतः या सभेच्या आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी काय घोषणा करणार याकडे जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलं आहे. रिलायन्सची सर्वसाधारण सभा दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. मुकेश अंबानी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभेला संबोधित करतील.
रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेकडून काय अपेक्षित?
दरवर्षी मुकेश अंबानी रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत आपल्या भाषणात महत्त्वाची घोषणा करतात. या घोषणा रिलायन्सची पुढील दिशा ठरवतात आणि गुंतवणूकदारांना नव्या संधी देतात. यंदाच्या सभेत रिलायन्स आपल्या महत्त्वकांक्षी ५ जी लाँचबाबत काय घोषणा करते हे महत्त्वाचं ठरणार आहे. भारतात रिलायन्स जिओ ५ जी लाँचिंगसाठी कोणती तारीख घोषित करते याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.
याशिवाय रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या आयपीओसंदर्भात देखील काय निर्णय झाला हेही लवकरच कळेल. महत्त्वाचं म्हणजे मुकेश अंबानी आपल्या उद्योगविश्वाची जबाबदारी पुढच्या पीढिच्या खांद्यावर टाकणार का हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याकडेही सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे.
रिलायन्सची सभा मेटावर्सवरही दिसणार
यंदाची रिलायन्स उद्योग समुहाची सर्वसाधारण सभा मेटावर्सवरही पाहता येणार आहे. याबाबत स्वतः कंपनीनेच घोषणा केली आहे.
हेही वाचा : Mukesh Ambani Resigns : मुकेश अंबानींचा मोठा निर्णय! रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा राजीनामा
ही सभा कुठे कुठे पाहता येणार?
रिलायन्सची ही सभा ट्विटर, फेसबूक, कू, जिओ मीट आणि यूट्यूबसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपवरही याचे अपडेट्स मिळवता येतील. त्यासाठी ७९७७११११११ या क्रमांकांवर ‘Hi’ असा मेसेज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ही सभा पाहण्याबाबत सूचना मिळतील.