Whatsapp Down in India: जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले. पहिल्या अर्ध्या तासातच हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं. मात्र, अखेर जवळपास दोन तासांच्या विस्कळीत सेवेनंतर, व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा पूर्ववत सुरू झालं आहे.

सर्व्हरमध्ये बिघाड?

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आधी समोर आली होती. यासंदर्भात काही कालावधीनंतर व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृतरीत्या प्रतिक्रिया देताना ‘लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती देण्यात आली. मात्र, अचानक व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्यामुळे लाखो नेटिझन्सनी ट्विटरकडे धाव घेत आपला संताप तिकडे व्यक्त केला.

Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
india post payment bank scam
India Post Payments Bank धारकांनो सावधान! अन्यथा तुमचेही अकाउंट होईल रिकामी; टाळण्यासाठी घ्या ‘ही’ काळजी
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी
Swiggy launches new app Snacc
Swiggy : फक्त १५ मिनिटांत जेवण पोहोचणार तुमच्या घरी! स्विगीची नवी सुविधा नेमकी कशी आहे? जाणून घ्या
Govinda And Shakti Kapoor
“असुरक्षितता माणसाला कुठून कुठे…”, शक्ती कपूर यांचे गोविंदा यांच्याबद्दल वक्तव्य, म्हणाले, “इतक्या वर्षांत…”
India campaign to kill terrorists in Pakistan print exp
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्या घडवून आणण्याची भारताची मोहीम? ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या दाव्यात किती तथ्य?

“आम्हाला माहिती आहे की सध्या काही युजर्सला व्हॉट्सअॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. आम्ही त्यावर काम करत असून लवकरात लवकर सगळ्यांसाठी सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी दिली होती.

नेमकं घडलं काय?

दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी युजर्सला अडचणी यायला सुरुवात झाल्याची नोंद डाऊन डिटेक्टरने केली आहे. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन साधारणपणे एक वाजेपर्यंत अडचणी येत असल्याच्या हजारो तक्रारी समोर आल्या. यातील बहुतेक तक्रारी या मेसेज पाठवता येत नसल्याच्या होत्या. तर इतर तक्रारींमध्ये सर्व्हर डिसकनेक्शन आणि मोबाईल अॅप क्रॅश होणे अशा तक्रारींचा समावेश होता.

काही युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर नेटिझन्स ट्विटरवर आल्याचं सांगणारं मीम शेअर केलं.

Story img Loader