Whatsapp Down in India: जगभरात कोट्यवधी युजर्स असणारं व्हॉट्सअ‍ॅप भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी दुपारी १२च्या सुमारास डाऊन झालं. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटरवर येऊन यासंदर्भात ट्वीट्स करू लागले आहेत. एकीकडे काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे हा सायबर हल्ला असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. सुरुवातीला काही काळ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नव्हते. मात्र, काही वेळानंतर पर्सनल चॅटदेखील बंद झाले. पहिल्या अर्ध्या तासातच हजारो युजर्सनी ही समस्या येत असल्याचं ट्विटरवर सांगितलं. मात्र, अखेर जवळपास दोन तासांच्या विस्कळीत सेवेनंतर, व्हॉट्सअ‍ॅप पुन्हा पूर्ववत सुरू झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्व्हरमध्ये बिघाड?

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आधी समोर आली होती. यासंदर्भात काही कालावधीनंतर व्हॉट्सअ‍ॅपकडून अधिकृतरीत्या प्रतिक्रिया देताना ‘लवकरात लवकर बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत’, अशी माहिती देण्यात आली. मात्र, अचानक व्हॉट्सअ‍ॅप बंद पडल्यामुळे लाखो नेटिझन्सनी ट्विटरकडे धाव घेत आपला संताप तिकडे व्यक्त केला.

“आम्हाला माहिती आहे की सध्या काही युजर्सला व्हॉट्सअॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. आम्ही त्यावर काम करत असून लवकरात लवकर सगळ्यांसाठी सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, अशी प्रतिक्रिया व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्यांनी दिली होती.

नेमकं घडलं काय?

दुपारी १२ वाजून ७ मिनिटांनी युजर्सला अडचणी यायला सुरुवात झाल्याची नोंद डाऊन डिटेक्टरने केली आहे. त्यानंतर ही संख्या वाढत जाऊन साधारणपणे एक वाजेपर्यंत अडचणी येत असल्याच्या हजारो तक्रारी समोर आल्या. यातील बहुतेक तक्रारी या मेसेज पाठवता येत नसल्याच्या होत्या. तर इतर तक्रारींमध्ये सर्व्हर डिसकनेक्शन आणि मोबाईल अॅप क्रॅश होणे अशा तक्रारींचा समावेश होता.

काही युजर्सनी व्हॉट्सअ‍ॅप डाऊन झाल्यानंतर नेटिझन्स ट्विटरवर आल्याचं सांगणारं मीम शेअर केलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats app down group messaging issue only personal chats working pmw