अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिरात २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होत असून त्यानंतर या मंदिराचे लोकार्पण होणार आहे. मंदिर खुले झाल्यानंतर काय होणार? उर्वरित बांधकाम कधीपर्यंत पूर्ण केले जाणार? याबाबतची महत्त्वाची माहिती श्री राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी आज (दि. २१ जानेवारी) दिली आहे.

“प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होताच. २३ जानेवारी पासून आम्ही पुन्हा नव्या जोमाने आणि उत्साहाने मंदिराच्या बांधकामाची सुरुवात करणार आहोत. २०२४ संपेपर्यंत सर्व बांधकाम पूर्ण झालेले असेल. तसेच मंदिर परिसरात आणखी सात मंदिराचे बांधकाम केले जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा होताच याही मंदिरांचे बांधकाम सुरू करण्यात येईल”, अशी माहिती समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.

Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
maharashtra assembly elections
२०१९ च्या त्या बैठकीत काय घडलं? कथित सत्तांतर घडवणारी बैठक कधी, केव्हा, कुठे झाली होती?
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना नृपेंद्र मिश्रा म्हणाले की, ज्याठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे, त्याठिकाणचे सर्व काम पूर्ण झालेले आहे. हे आम्ही देशाला सांगू इच्छितो. “प्राणप्रतिष्ठेपूर्वीचा आजचा दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्याच्या तयारीचा आढावा आज आम्हाला घ्यायचा आहे. आम्ही देशाला जे वचन दिलं आहे, ते पूर्ण करण्याची जबाबदारी आज पार पाडायची आहे”, अशी प्रतिक्रिया नृपेंद्र मिश्रा यांनी दिली.

“राम मंदिराचे बांधकाम अर्धवट असले तरी…”, निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा खुलासा करताना म्हणाले…

दरम्यान संपूर्ण अयोध्या नगरी २२ जानेवारीच्या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज अनेक धार्मिक विधी पार पाडले जात आहेत. मंगल ध्वनी या नावाने सांगितिक कार्यक्रम अयोध्यात आज होत आहे. उद्या (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी येतील. राम मंदिरात हा विधी १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल.

कोण आहेत नृपेंद्र मिश्रा?

प्रधान सचिवांपासून उत्तर प्रदेशमधील दोन मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्यासह, पंतप्रधान कार्यालयात प्रशासकीय अधिकारी ते श्रीराम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि मुख्य वास्तुविशारद म्हणून नृपेंद्र मिश्रा मंदिर बांधकाम प्रकल्पाची जबाबदारी सांभाळत आहेत.

पंतप्रधान मोदींचे विश्वासू; कोण आहेत राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र ?

फेब्रुवारी २०२० मध्ये जेव्हा मिश्रा यांनी जबाबदारी स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांच्यासमोर मंदिर निर्माण समितीचा अध्यक्ष म्हणून अनेक आव्हाने होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मिश्रा यांची निवड करण्यामागील उद्देश स्थापत्य अभियांत्रिकीतील कौशल्य किंवा मंदिर बांधकामात आवश्यक असणारे आगमा शास्त्राचे ज्ञान नव्हते. त्यांच्यासाठी आवश्यक होतं भाजपा आणि संघ परिवाराच्या सर्वात महत्त्वाच्या वैचारिक प्रकल्पाला प्रत्यक्षात उतरवणं.