सध्या व्हॉट्स अॅपचा जमाना आहे, बुधवारी या अपचा प्रसार भारतात किती प्रमाणात झाला आहे, याची आकडेवारी जाहीर झाली असून, ताबडतोब संदेश पाठवण्याच्या या अपचा वापर ५० कोटी भारतीय क्रियाशीलपणे करीत आहेत.
रोज ७० कोटी छायाचित्रे व १० कोटी व्हिडिओ एकमेकांना आदानप्रदान केल्या जातात. जगातील अर्धा अब्ज लोक नियमितपणे व्हॉट्स अॅप सेवा वापरतात, असे त्यांच्या अधिकृत ब्लॉगवर म्हटले आहे. येत्या काही महिन्यात फ्री व्हॉइस कॉल सेवा व्हॉट्स अॅपवर काही महिन्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गेल्या काही महिन्यात ब्राझील, मेक्सिको, रशिया या देशात त्याचा प्रसार वाढत असून मोठय़ा प्रमाणात त्याचा वापर केला जात आहे.
व्हॉट्स अॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅन कोम यांनी रिकोड या संकेतस्थळाला सांगितले, की व्हॉट्स अॅपचे ५० कोटी वापरकत्रे असून त्यातील ४.८ कोटी वापरकत्रे भारतात आहेत. ब्राझीलमध्ये ४.५ कोटी लोक व्हॉट्स अॅप वापरतात. व्हॉट्स अॅपची सुरुवात २००९ मध्ये झाली नंतर फेसबुकने ते फेब्रुवारीत १९ अब्ज डॉलरला विकत घेतले.
एकूण विचार केला तर फेसबुक व व्हॉट्स अॅपचे आता १.५ अब्ज क्रियाशील वापरकत्रे आहेत. मोबाइल विशेष करून स्मार्टफोनमुळे त्याचा वापर वाढला आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार व्हॉट्स अॅपने २४ तासांत ६४ अब्ज संदेशांची देवाणघेवाण केली आहे, हा एक विक्रम आहे.
व्हॉट्स अॅपचा फेसबुकला आíथक फायदा कसा होत आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही कारण त्यात जाहिराती दाखवल्या जात नाहीत. यात काही बदल करण्याचा विचार नाही, असे व्हॉट्स अॅपचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोम व फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.
आमच्या अपची वाढ वेगात होत असली, तरी आम्ही त्यातून लगेच पसे कसे मिळतील हे बघणार नाही असे कोम यांनी सांगितले. स्वच्छ व वेगवान तसेच वापरण्यास सोपी संदेश पाठवण्याची एक पद्धती एवढाच सध्या मर्यादित उद्देश आहे असे कोम यांनी सांगितले.
व्हॉट्स अॅपचे वापरकर्ते
एकूण – ५० कोटी
भारत – ४.८ कोटी
ब्राझील – ४.५ कोटी
(२४ तासांत ६४ अब्ज संदेशांच्या देवाणघेवाणीचा व्हॉट्स अॅपचा विक्रम).
व्हॉट्स अॅपची मोफत व्हॉइस कॉल सेवा
सध्या व्हॉट्स अॅपचा जमाना आहे, बुधवारी या अपचा प्रसार भारतात किती प्रमाणात झाला आहे, याची आकडेवारी जाहीर झाली असून, ताबडतोब संदेश पाठवण्याच्या या अपचा वापर ५० कोटी भारतीय क्रियाशीलपणे करीत आहेत.
First published on: 24-04-2014 at 04:07 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp crosses half a billion user mark strong growth in india and brazil