संवादाचं माध्यम असलेलं व्हॉट्सअ‍ॅप बुधवारी दुपारी अचानक बंद पडलं आणि नेटकऱ्यांचा काही काळ खोळंबा झाला. गेल्या दहा वर्षांपासून संवादाचं प्रमुख साधन असलेलं व्हॉट्सअ‍ॅप अचानक बंद झाल्याने चांगलीच तारांबळ उडाली होती. भारतासह अनेक देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप धारकांना या समस्येचा सामना करावा लागला. तब्बल दोन तास ही सेवा ठप्प होती. सेवा ठप्प असल्याने व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्ते मेसेज, ऑडिओ, व्हिडीओ यापैकी कोणतीही सेवा वापरण्यात असमर्थ ठरत होते. दरम्यान व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या मेटाने याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं असून, सेवा ठप्प असण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.

‘इंडिया टुडे’शी बोलताना कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आमच्या बाजून झालेल्या तांत्रिक त्रुटीमुळे ही समस्या निर्माण झाली होती. पण आता ही समस्या सोडवण्यात आली आहे असंही कंपनीने सांगितलं आहे.

WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Shocking video of Kidnapping where a man saved girls life video viral on social media
काळ आला होता पण वेळ आली नव्हती! त्याने तिला जबरदस्तीने व्हॅनमध्ये बसवलं अन्…, अपहरणाचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Chandrashekhar Bawankule gave hints about confusion over allocation of guardian ministers will end in two days
पालकमंत्री वाटपाचा घोळ दोन दिवसात संपणार, बावनकुळेंचे संकेत
WhatsApp users in India can use UPI for payments
आता WhatsApp Pay द्वारे थेट करा UPI पेमेंट; पैशांची देवाण-घेवाण होईल सोपी; कसे ते घ्या जाणून…
now buy laptops monitors and printers on Blinkit
दुकानात जाण्याचे टेन्शन दूर! फक्त १० मिनिटांत डिलिव्हर होणार लॅपटॉप, मॉनिटर, प्रिंटर; ‘Blinkit’ची नवीन सेवा सुरू!
mumbai sindhudurg air plane
मुंबई – सिंधुदुर्ग विमानसेवा दोन महिने बंद
Tadoba online booking scam officials questioned three months ago
ताडोबा ऑनलाईन बुकींग घोटाळा, तीन महिन्यांपूर्वीच अधिकाऱ्यांची चौकशी

व्हॉट्सअ‍ॅप थांबले अन् ठोका चुकला; चर्चा-चिंतेनी वापरकर्त्यांचे दोन तास पोखरले

दरम्यान ‘मेटा’ने तांत्रिक त्रुटीबद्दल सविस्तर माहिती देण्यास नकार दिला असल्याने ते अस्पष्ट आहे. योगायोगाने ऑक्टोबर महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांमध्येही मोठी घट झाली आहे. त्यावेळी कंपनीने डीएनएसशी (Domain Name System) संबंधित कारणामुळे त्यांची व्हॉट्सअ‍ॅप सेवा बंद झाल्याचं सांगितलं होतं.

‘मेटा’ने एका ब्लॉगही पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की “आमच्या इंजिनिअरिंग टीमला डेटा सेंटरमधील नेटवर्क ट्राफिकमध्ये समन्वय साधणाऱ्या बॅकबोन राऊटर्समधील कॉन्फिगरेशन बदलांमुळे संवादात समस्या येत असल्याचं लक्षात आलं आहे. नेटवर्क ट्राफिकमधील या व्यत्ययामुळे डेटा सेंटर्सच्या संवादावर परिणाम होतो आणि आमच्या सेवा थांबतात”.

बुधवारी व्हॉट्सअ‍ॅपला अशाच समस्येचा सामना करावा लागला असण्याची शक्यता आहे. मात्र कंपनीने अद्याप यासंबंधी काही स्पष्ट सांगितलेलं नाही.

Story img Loader