जगभरात मोबाईल मेसेजिंगसाठी मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येणाऱ्या Whatsapp मध्ये आज दुपारी अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लाखो युजर्सनं ट्विटरकडे आपला मोर्चा वळवला. व्हॉट्सअॅपवर युजर्सला आधी ग्रुप्सवर मेसेज पाठवता येत नव्हते. मात्र, काही काळाने पर्सनल चॅट्सवरही मेसेज पाठवणं अशक्य होऊन बसलं. काही युजर्सला सर्व्हर डिसकनेक्शनचा मेसेज येऊ लागला, तर काहींचं मोबाईल अॅपच क्रॅश होऊ लागलं. साधारणपणे दुपारी १२च्या सुमारास हा सगळा प्रकार सुरू झाल्यानंतर जवळपास दीड तासानंतर व्हॉट्सअॅपची कंपनी असलेल्या ‘मेटा’ कडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

काय म्हणणंय ‘मेटा’चं?

युजर्स ट्विटरवर आपला राग व्यक्त करत असताना कंपनीने एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये यासंदर्भात तातडीने कार्यवाही करत असल्याचं सांगितलं आहे. “आम्हाला माहिती आहे की सध्या काही युजर्सला व्हॉट्सअॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. आम्ही त्यावर काम करत असून लवकरात लवकर सगळ्यांसाठी सेवा पुन्हा सुरळीत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असं ‘मेटा’च्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
Salman Khan denies association with The Great Indian Kapil Show
“कुठे थांबायचं याचा विसर…”, भावना दुखावल्याने कपिल शर्माच्या शोमुळे सलमान खानला कायदेशीर नोटीस? अभिनेत्याने दिलं स्पष्टीकरण
Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Bigg Boss 18 Digvijay rathee girlfriend Unnati tomar announce breakup
Bigg Boss 18मध्ये इन्फ्लुएन्सर, इकडे गर्लफ्रेंडने सोशल मीडियावर केली ब्रेकअपची घोषणा, सात महिन्यात संपलं नातं

WhatsApp Outage: तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सअ‍ॅप झालं डाऊन, युजर्सची ट्विटरकडे धाव!

आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर काही युजर्सला मेसेज पाठवण्यास अडचणी येऊ लागल्या होत्या. हे मेसेजिंग बंद झाल्यानंतर काही काळाने पर्सनल चॅट्सवरही मेसेज जात नसल्यामुळे युजर्समध्ये अस्वस्थता निर्माण झाली. ट्विटरवर असंख्य युजर्सनी आपला राग व्यक्त केला असून लवकरात लवकर ही समस्या सोडवण्यात यावी, अशी मागणी युजर्सकडून करण्यात येत आहे.