काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आज श्रीनगर येथे समारोप होत आहे.आज सकाळपासूनच काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु असून बर्फवृष्टीतच काँग्रेसची समारोप सभा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगितला. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा असून प्रेम, बंधुभाव वाढावा यासाठी भारत जोडो यात्रेने प्रयत्न केले असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी काश्मिरच्या लोकांच्या भावनेला हात घालत आपली आजी इंदिरा गांधी आणि वडील राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर आपल्या मनावर काय परिणाम झाला, याची थोडक्यात माहिती दिली. आज ज्यांच्या घरातले सैनिक शहीद होतात, काश्मिरमधील लोक जेव्हा स्वतःच्या घरातले जवळचे लोक गमावतात, तेव्हा त्यांची मनस्थिती काय होत असेल? हे मी आणि माझी बहीण चांगल्यारितीने समजू शकतो, कारण आम्ही दोघे त्या परिस्थितीतून गेलो असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा