Independence Day Speech by PM Modi : भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक अनोखं स्वप्न आज लाल किल्ल्यावरून दाखवलं आहे. आतापर्यंत विकसनशील असलेला भारत देश २०४७ साली विकसित बनले यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यासाठी तरुण, महिला, शेतकऱ्यांच्या साथीने स्वप्न पूर्ण करण्यासह देशातील तीन आव्हांनाविरोधात कडवी झुंज देत पूर्ण करायचं आहे, असं मोदी म्हणाले.
“माझ्या प्रिय कुटुंबातील नागरिकांनो, मी आज लाल किल्ल्यावरून तुमच्याकडून काहीतरी मागायला आलोय, मी आज तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो आहे. मी अनुभवाच्या आधारे बोलतोय, आज गांभीर्याने घ्यावं लागले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात २०४७ मध्ये जेव्हा देश स्वातंत्र्यांची १०० वर्षे पूर्ण करेल, तेव्हा जगभरात भारताचा तिरंगा झेंडा विकसित भारताचा झेंडा असेल”, असं मोदी म्हणाले.
हेही वाचा >> आगामी एक हजार वर्षात काय होणार? लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी सांगितलं अमृत कालखंडाचं महत्त्व
“सुचिता, पारदर्शकता, निष्पक्षता याची आपल्या देशाला गरज आहे. संस्था, नागरिक आणि परिवार म्हणून हे आपलं सामूहिक दायित्व असलं पाहिजे. गेल्या ७५ वर्षांचा इतिहास पाहा. भारताच्या सामर्थ्यात काहीही कमतरता नव्हती. या देशाला सोन्याचा चिमणी म्हणून ओळखली जायची. त्याच सामर्थ्याला घेऊन २०४७ मध्ये माझा देश विकसित भारत बदललेला असेल”, असंही मोदी म्हणाले.
“२०४७ पर्यंत माझा भारत देश विकसित भारत होईल. हे मी माझ्याकडे उपलब्ध असलेल्या संसधनांच्या आधारे बोलत आहे. सर्वांत जास्त तीस वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या लोकसंख्येच्या आधारे मी बोलत आहे. माझ्या आई-बहिणींच्या सामर्थ्याच्या आधारे बोलत आहे. परंतु, यासमोर काही अडचणी आहेत. आपल्या देशातील काही कृती समाजव्यवस्थेला बिघडवत आहेत. कधीकधी तर आपण आपले डोलेच बंद करून घेतो. पण आता डोळे बंद करण्याची वेळ नाही. जर आपली स्वप्न पूर्ण करायची असतील, संकल्प पूर्ण करायचे असतील, तर डोळ्यांत डोळे घालून तीन अडचणींशी लढावं लागणार आहे”, असंही मोदी म्हणाले.
या तीन अडचणी कोणत्या?
भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या विरोधात भारताला लढावं लागणार आहे, असं मोदी म्ङणाले. भ्रष्टाचााराविरोधात लढत राहणार आहे असं सांगून घराणेशाहीने देशाला जखडून ठेवलं आहे. यामुळे देशातील लोकांचे हक्क हिरावून घेण्यात आले आहेत. तर, तुष्टीकरणामुळे राष्ट्रीय चरित्राला डाग लागला आहे. या तिन्ही आव्हांनाविरोधात लढायचं आहे, असं मोदी म्हणाले.