काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी ब्रिटनच्या दौऱ्यावर आहेत. केंब्रिज विद्यापीठात राहुल गांधींनी संबोधित केलं. तेव्हा राहुल गांधींनी काश्मीरमध्ये ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान घडलेला एक थरारक प्रसंग सांगितला आहे. सुरक्षा दलाने मला पायी न चालण्याचा सल्ला दिला होता. तरीही, मी यात्रा काढली. तेव्हा दहशवाद्यांशी माझा सामना झाला, असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.
राहुल गांधी म्हणाले, “यात्रा सुरु असताना आमच्यावर हल्ला करण्यात येईल, असं सांगितलं गेलं होतं. तरी देखील आम्ही यात्रा सुरु ठेवली. यात्रेत एका व्यक्तीने म्हटलं, त्याला बोलायचं आहे. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, लोकांना आपल्याजवळ बोलवू नका. तरीही त्या व्यक्तीला मी बोलवलं.”
“त्या व्यक्तीने मला विचारलं, तुम्ही खरंच आमच्या समस्या सोडवणार आहात का? मी म्हटलं, हो… पुढं चालत असताना तो व्यक्ती म्हणाला की तिकडे पाहा.. तो दहशतवादी आहे. सामान्यरित्या दहशतवाद्याने माझ्यावर हल्ला करायला हवा होता, अशा वातावरणात आम्ही होते. मी त्याला पाहत होतो आणि तो मला. मला अडचणीत असल्यासारखं वाटलं. आम्ही एकमेकांना पाहत होते. पण, काही घडत नाही आणि आम्ही पुढं निघू येतो,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
हेही वाचा : “मला एका गुप्तचर अधिकाऱ्याने फोन केला आणि…”, राहुल गांधींचा पेगाससबाबत गंभीर आरोप
“त्यांच्याजवळ ताकद नव्हती असं नाही. मात्र, मी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलो होते. कोणत्याही हिंसेबरोबर आलो नव्हतो. सर्व लोकं हे पाहत होते,” असं राहुल गांधींनी सांगितलं आहे.