Dr. Manmohan Singh Dies at 92 भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्तम अर्थतज्ज्ञ अशी मनमोहन सिंग यांची ख्याती होती. देशाच्या पंतप्रधान पदी विराजमान झालेले ते पहिले शीख पंतप्रधान होते. २००४ ते २०१४ अशी दहा वर्षे त्यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून काम केलं. उत्तम अर्थतज्ज्ञ अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या जाण्याने आपला देश एका महान अर्थतज्ज्ञाला पारखा झाला आहे. २०१४ मध्ये भाजपाची सत्ता आली. पंतप्रधानपद सोडल्यानंतर मनमोहन सिंग कुठे राहात होते आपण जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे रहात होते?

पंतप्रधान पद सोडल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर माजी पंतप्रधान दिल्लीतल्या मोतिलाल नेहरु मार्गावर असलेल्या बंगला क्रमांक ३ मध्ये वास्तव्य करत होते. २०१४ च्या जून महिन्यानंतर ते या बंगल्यात राहू लागले. ते याच बंगल्यात वास्तव्य करत होते.

मनमोहन सिंग यांच्या बंगल्याची खासियत काय?

मनमोहन सिंग यांच्या आधी या बंगल्यात दिल्लीच्या दिवंगत मुख्यमंत्री शीला दीक्षित वास्तव्य करत होत्या. दिल्ली विधानसभेत आपचा विजय झाल्यानंतर शीला दीक्षित यांनी हे निवासस्थान सोडलं होतं. शीला दीक्षित यांचं निधन २०१९ मध्ये झालं होतं. दरम्यान या बंगल्याचं नुतनीकरणही करण्यात आलं होतं.

हे पण वाचा- Photos : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाहांनी डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली आदरांजली

मी अॅक्सिडेंटल अर्थमंत्रीही आहे असं का म्हणाले होते मनमोहन सिंग?

२०१९ मध्ये माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं ‘चेजिंग इंडिया’ या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी मनमोहन सिंग म्हणाले होते, मला देशात अॅक्सिडेंटल पीएम म्हटलं गेलं. मला तर वाटतं की मी अॅक्सिडेंटल अर्थमंत्रीही होतो. त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होतो ज्यात मनमोहन सिंग यांनी ते अर्थमंत्री कसा झालो ते सांगितलं होतं. मनमोहन सिंग म्हणाले, “पी.व्ही. नरसिंहराव यांचं सरकार होतं. मी माझ्या कार्यालयात बसलो होतो. त्यांनी मला फोन केला मला विचारलं की तुम्ही कुठे आहात? मी त्यांना सांगितलं मी माझ्या कार्यालयात बसलो आहे. त्यावेळी त्यांचं उत्तर आलं की तुम्हाला मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे.” मला मंत्री व्हायचं आहे हे मला त्यावेळी खरं वाटलं नव्हतं असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. आता त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

२००६ मध्ये मनमोहन सिंग यांना डॉक्टरेट ऑफ लॉ ही पदवी देण्यात आली

२००६ या वर्षी मनमोहन सिंग यांना केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत (Cambridge University) ‘डॉक्टरेट ऑफ लॉ’ ही पदवी देण्यात आली. यावेळी डॉ. मनमोहन सिंग यांनी आपण निळी पगडी का घालतो, याविषयी मनमोहन सिंग यांनी सांगितलं होतं. ही आठवण आजही लोकांच्या स्मरणात आहे.डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले होते की, जेव्हा ते ‘केम्ब्रिज’मध्ये शिकत होते तेव्हा ते निळी पगडी घालायचे. यावरून त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव ‘ब्ल्यू टर्बन’ असे ठेवले होते. डॉ. मनमोहन सिंग सांगतात की, निळ्या रंगाची पगडी घालण्यामागे कोणतेही विशिष्ट कारण नाही. त्यांना निळा रंग खूप आवडतो म्हणून ते निळ्या रंगाची पगडी घालतात.