पंतप्रधान नरेंद्र मदी यांचा ९ तारखेला मोठ्या उत्साहात शपथविधी झाला. त्यांच्याबरोबर ७१ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु, एकीकडे शपथविधी सुरू असताना राष्ट्रपती भवनात बिबट्या दिसला असल्याची चर्चा आहे. हा बिबट्या एका ठिकामाहून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याचंही स्पष्ट दिसलं. दर्यान, या व्हिडओमादगची सतत्या आता पडताळण्यात आली असून तो नेमका कोणता प्राणी होता हे स्पष्ट झालं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्गादास उइके मंत्रिपदाची शपथ घेत असताना मंचामागे असलेल्या राष्ट्रपती भवनाच्या पायऱ्यांजवळून एक जंगली प्राणी चालत जात असल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. हा जंगली प्राणी असून बिबट्या होता अशी चर्चा समाजमाध्यमांवर रंगली होती. परंतु, याबाबत ठोस माहिती देण्यात येत नव्हती. कारण हा प्राणी कॅमेऱ्यापासून खूप लांब असल्यामुळे स्पष्ट दिसत नव्हता. दरम्यान, तो प्राणी जंगली किंवा हिंस्र प्राणी नसून राष्ट्रपती भवनातील एक सामान्य मांजर होती.

हेही वाचा >> Video: मोदींचे मंत्री शपथ घेत असताना राष्ट्रपती भवनात दिसला बिबट्या? मंचाजवळून ऐटीत चालत गेला अन्…

याबाबत दिल्ली पोलिसांनी अधिकृत माहिती दिली. ते म्हणाले, काही मीडिया चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल काल राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभाच्या थेट प्रक्षेपणादरम्यान कॅप्चर केलेली प्राणी प्रतिमा दाखवत आहेत आणि तो वन्य प्राणी असल्याचा दावा करत आहेत. या दाव्यात काही तथ्य नाही. कॅमेऱ्यात कैद झालेला प्राणी सामान्य घरातील मांजर आहे. कृपया अशा फालतू अफवांना अजिबात लागू नका.

भाजपाचे खासदार दुर्गादास उईके आणि अजय टमटा शपथ घेत असताना हा प्राणी दिसला. इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल होताच नेटिझन्सने त्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दरम्यान, शपथविधीनंतर पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी खातेवाटप जाहीर केलं. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जसे की, अमित शाह यांच्याकडील गृह विभाग, राजनाथ सिंह (संरक्षण), निर्मला सीतारामण (अर्थ), एस. जयशंकर (परराष्ट्र) आणि नितीन गडकरी यांच्याकडील रस्ते वाहतूक तथा महामार्ग मंत्रालय कायम ठेवण्यात आलं आहे. तर भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय सोपवण्यात आलं आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचं मुख्यमंत्रिपद काढून घेत केंद्रात बोलावणं धाडलेल्या शिवराज सिंह चौहान यांना कृषीमंत्रिपद देण्यात आलं आहे.

कुणाला कुठलं मंत्रिपद? (कॅबिनेट)

राजनाथ सिंह – संरक्षण मंत्री
अमित शाह – गृहमंत्री; सहकार मंत्री
नितीन गडकरी – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री
जगत प्रकाश नड्डा – आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री
शिवराज सिंह चौहान – कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामविकास मंत्री
निर्मला सीतारामण – अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री
डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर – परराष्ट्र व्यवहार मंत्री
मनोहर लाल खट्टर – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आणि उर्जा मंत्री.
एच. डी. कुमारस्वामी – अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री
पीयूष गोयल – वाणिज्य आणि उद्योग मंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री
जीतन राम मांझी – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
राजीव रंजन सिंह उर्फ ​​ललन सिंह – पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री
सर्वानंद सोनोवाल – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री
वीरेंद्र कुमार – सामाजिक न्याय मंत्री
के. आर. नायडू – नागरी विमान वाहतूक मंत्री
प्रल्हाद जोशी – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री
जुआल ओरम – आदिवासी व्यवहार मंत्री
गिरीराज सिंह – वस्त्रोद्योग मंत्री
अश्विनी वैष्णव – रेल्वेमंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री, आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया – दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
भूपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री
गजेंद्रसिंह शेखावत – सांस्कृतिक कार्य मंत्री आणि पर्यटन मंत्री
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्री
किरेन रिजिजू – संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री
हरदीप सिंग पुरी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री
मनसुख मांडविय – कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा कार्य तथा क्रीडा मंत्री
जी. किशन रेड्डी – कोळसा मंत्री आणि खाण मंत्री
चिराग पासवान – अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
सी. आर. पाटील – जलशक्ती मंत्री

राज्यमंत्री आणि त्यांच्याकडील खाती

जितिन प्रसाद – वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री; इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री
श्रीपाद येसो नाईक – ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री
पंकज चौधरी – अर्थ राज्यमंत्री.
कृष्ण पाल – सहकार राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री.
राम नाथ ठाकूर – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री.
नित्यानंद राय – गृह राज्यमंत्री.
अनुप्रिया पटेल – आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, रसायने आणि खते राज्यमंत्री
व्ही. सोमन्ना – जलशक्ती राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
चंद्रशेखर पेम्मासानी – ग्रामीण विकास राज्यमंत्री आणि दळणवळण राज्यमंत्री.
एस. पी. सिंह बघेल – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि पंचायती राज राज्यमंत्री
शोभा करंदलाजे – सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री आणि कामगार आणि रोजगार राज्यमंत्री
कीर्तिवर्धन सिंह – पर्यावरण, वन आणि हवामान बदल राज्यमंत्री आणि परराष्ट्र राज्यमंत्री.
बी.एल. वर्मा – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री आणि सामाजिक न्याय तथा सक्षमीकरण राज्यमंत्री
शंतनू ठाकूर – बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री
सुरेश गोपी – पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री आणि पर्यटन राज्यमंत्री
डॉ. एल. मुरुगन – माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री
अजय टम्टा – रस्ते वाहतूक आणि महामार्ग राज्यमंत्री
बंदी संजय कुमार – गृह राज्यमंत्री
कमलेश पासवान – ग्रामीण विकास राज्यमंत्री
भगीरथ चौधरी – कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री
सतीशचंद्र दुबे – कोळसा आणि खणिकर्म राज्यमंत्री
संजय सेठ – संरक्षण राज्यमंत्री
रवनीत सिंह – अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि रेल्वे राज्यमंत्री
दुर्गादास उईके – आदिवासी व्यवहार राज्यमंत्री
रक्षा खडसे – युवा कार्य आणि क्रीडा राज्यमंत्री
सुकांता मजुमदार – शिक्षण राज्यमंत्री आणि ईशान्य क्षेत्राच्या विकास विभागाचे राज्यमंत्री
सावित्री ठाकूर – महिला आणि बालविकास राज्यमंत्री
तोखन साहू – गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री
राजभूषण चौधरी – जलशक्ती राज्यमंत्री
भूपती राजू श्रीनिवास वर्मा – अवजड उद्योग राज्यमंत्री आणि पोलाद राज्यमंत्री
हर्ष मल्होत्रा ​​- कॉर्पोरेट व्यवहार राज्यमंत्री आणि रस्ते वाहतूक तथा महामार्ग राज्यमंत्री
निमूबेन बांभनिया – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री
जॉर्ज कुरियन – अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय राज्यमंत्री
पबित्रा मार्गेरिटा – परराष्ट्र राज्यमंत्री आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री