इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. गेल्या सहा दिवसांपासून हे युद्ध सुरू असून या युद्धामुळे जगातील देशांचे दोन गट पडतील असं चित्र दिसू लागलं आहे. काही देशांनी उघडपणे इस्रायलची बाजू घेतली आहे. तर काही देशांनी पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच हमास या दहशतवादी संघटनेच्या कारवाईचं काहींनी समर्थन केलं आहे. इराणधील हिजबुल्लाह ही दहशतवादी संघटना उघडपणे हमासचं समर्थन करत असून त्यांना शस्त्रास्रांचा पुरवठा करत आहे. तसेच इराणकडून हिजबुल्लाह आणि हमासला छुपा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे.

इस्रायल आणि हमासमधील युद्धात गेल्या पाच दिवसांत २,००० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. पॅलेस्टाईनमधील हमास या दहशतवादी संघटनेने शनिवारी (७ ऑक्टोबर) पहाटे इस्रायलवर शेकडो क्षेपणास्रं डागली आणि युद्धाला तोंड फुटलं. इस्रायलच्या सीमेवर गोळीबार आणि क्षेपणास्रांचा हल्ला झाल्यानंतर इस्रायलच्या सीमेवर अनागोंदी माजली. याच अनागोंदीचा फायदा घेत हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये घुसले. इस्रायलमध्ये घुसून दहशतवाद्यांनी इस्रायली नागरिकांची कत्तल सुरू केली. शेकडो लोकांची गोळ्या घालून हत्या केली. तसेच १५० हून अधिक इस्रायली स्त्रियांचं अपहरण केलं. बेसावध असताना इस्रायलवर झालेल्या या हल्ल्याने इस्रायलचे धाबे दणाणले. परंतु, या धक्क्यातून सावरत इस्रायलनेही लगेच गाझा पट्टीवर आणि हमासच्या अड्ड्यांवर क्षेपणास्रं डागली. हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या सहा दिवसांपासून युद्ध सुरू आहे. यामुळे इस्रायल आणि गाझा पट्टीत मोठी जीवितहानी झाली आहे.

syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
Syria loksatta news
अग्रलेख : वाळवंटातले वालीहीन!
Syria, Abu Mohammad Al Jolani, dictatorship Syria,
विश्लेषण : जिहादीचा बनला प्रशासक… कोण आहे सीरियाचा नवा शासक अबू मोहम्मद अल जोलानी?
Bashar al-Assad And Vladimir Putin.
Syrian Civil War : सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचं विमान खरंच क्रॅश झालं का? असद कुटुंबीयांसाठी पुतीन यांचे मोठे पाऊल
President Bashar al Assad forces defeated in parts of Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा… अध्यक्ष बशर अल असद परागंदा… नेमके काय घडले? अमेरिका, रशिया, इराण, तुर्कीयेचा काय संबंध?
Indian Foreign Secretary Vikram Misri visits Bangladesh
परराष्ट्र सचिव मिस्राी आज ढाक्यात; बांगलादेशला दोन्ही देशांतील तणाव निवळण्याची आशा

दरम्यान, जगभरातील अनेक देशांनी या युद्धाबाबत निवेदनं जारी करून आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने मंगळवारी (१० ऑक्टोबर) सकळी संयुक्त निवेदन जारी करत इस्रायलला पाठिंबा दर्शवला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. त्यामुळे आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निषेध करतो, असं या राष्ट्रांनी निवेदनात म्हटलं आहे. अमेरिका इस्रायलला शस्त्रास्रांचा पुरवठा करत आहे. तसेच अमेरिकन हवाई दलाची विमानं मध्य-पूर्व आशियात तैनात करण्यात आली आहेत. त्याचबरोबर भूमध्य समुद्रात अमेरिकेने युद्धनौका उतरवल्या आहेत. या पाच राष्ट्रांसह भारतानेही इस्रायलला उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, या बिकट परिस्थितीत आम्ही भारतीय लोक इस्रायलच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत. भारत अशा दहशतवादी कृत्यांचा तीव्र आणि निःसंदिग्धपणे निषेध करतो.

इराणने इस्रायलला डिवचलं

इस्रायलप्रमाणे पॅलेस्टाईनच्या बाजूनेही काही देश खंबीरपणे उभे राहिले आहेत. इराणमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाह ही हमासचं उघडपणे समर्थन करत आहे. तसेच हिजबुल्लाहला इराणचा छुपा पाठिंबा असल्याचा आरोप होत असला तरी इराणने हा आरोप फेटाळून लावला आहे. इराणचे प्रमुख नेते आयातुत्ला अली खोमेनी यांनी इस्रायलचा निषेध नोंदवला आहे. तसेच इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसादच्या अपयशावरून इस्रायलला डिवचलं आह. तसेच हमासच्या हल्ल्याचं समर्थन केलं आहे.

इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांचे हक्क हिरावले : सौदी अरब

अफगाणिस्तानमधील तालिबानी सरकारने दोन्ही देशांना शांततेचं आवाहन केलं असलं तरी हमासच्या कारवाईचं समर्थन केलं आहे. तसेच पॅलेस्टाईनच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला आहे. सौदी अरबनेही शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांचे हक्क हिरावल्याचा आरोप केला आहे. तर इराकमधील सशस्त्र संघटनांनी हमासला पाठिंबा दिला असून गाझामधील परिस्थितीला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. इराकने अद्याप उघडपणे हमासला पाठिंबा दर्शवलेला नाही.

लेबनानचा उघड पाठिंबा

येमेनचे नेते अब्दुल मलेक अल हौथी यांनी आरोप केला आहे की, गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाला अमेरिका जबबादार आहे. हा संघर्ष थांबवण्यास आम्ही पुढाकार घेऊ असंही अब्दुल मलेक यांनी म्हटलं आहे. कतारने उघडपणे पॅलेस्टाईनचं समर्थन केलं आहे. तसेच इस्रायलने पॅलेस्टिनी नागरिकांचे हक्क हिरावून घेतल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचा दावा केला आहे. कतारप्रमाणे लेबनाननेही उघडपणे पॅलेस्टाईनला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच लेबनानमधील दहशतवादी संघटना लेबनानच्या सीमेवरून इस्रायलवर हल्ले करत आहे. लेबनानने युद्धाच्या तिसऱ्या दिवशी या युद्धात उडी घेतली. इस्रायली सैन्य सध्या दोन आघाड्यांवर (लेबनान आणि हमास) लढत आहे.

हे ही वाचा >> “इस्रायल-हमास युद्धापासून दूर राहा, नाहीतर…”, अमेरिकेचा इराणला इशारा; बायडेन म्हणाले, “आमची लढाऊ विमानं…”

रशियाचे अमेरिकेवर आरोप

या युद्धात रशियाने पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या युद्धाला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. पुतिन म्हणाले, मध्य पूर्वेत सध्याच्या घडीला जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामागे अमेरिकाच आहे. इस्रायल-हमास युद्धाबाबत भूमिका स्पष्ट करताना पुतिन म्हणाले, तिथली परिस्थिती सुधारण्यासाठी सर्वात आधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्णयांतर्गत पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र घोषित करण्याची गरज आहे.

Story img Loader