गुजरातच्या गांधीनगर महापालिकेतील क्लार्क पदासाठी नुकतीच भरती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलच्या उपोषणासंबंधी प्रश्न विचारण्यात आला. पटेल समाजाला आरक्षण आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी या मागणीसाठी हार्दिक पटेल मागच्या १९ दिवसांपासून उपोषणाला बसला होता. मागच्या बुधवारीच त्याने हे उपोषण सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

क्लार्क भरती परीक्षेत हार्दिक पटेलने उपोषण सोडावे यासाठी कुठल्याही राजकीय नेत्याने त्याला पाणी दिले ? असा प्रश्न विचारण्यात आला. उत्तरासाठी शरद यादव, शत्रुघ्न सिन्हा, लालू प्रसाद यादव आणि विजय रुपानी असे चार पर्याय देण्यात आले होते. हार्दिक पटेल २५ ऑगस्टपासून उपोषणाला बसला होता. ६ सप्टेंबरपासून त्याने पाणी पिणे बंद केले. प्रकृती ढासळल्यामुळे त्याला सात सप्टेंबरला रुग्णालयात हलवण्यात आले.

अखेर १२ सप्टेंबरला शरद यादव यांच्या हातून पाणी पिऊन त्याने उपोषण सोडले. या उपोषणा दरम्यान अनेक नेत्यांनी हार्दिक पटेलची भेट घेतली. क्लार्क भरती परीक्षेत हार्दिक पटेलचा प्रश्न कसा विचारण्यात आला ? असा प्रश्न पत्रकारांनी गांधीनगरचे महापौर प्रवीणभाई पटेल यांना विचारला. त्यावर त्यांनी आपल्याला याबद्दल काही ठाऊक नाही असे उत्तर दिले. निवडून आलेल्या नगरसेवकांकडे परीक्षेची जबाबदारी नव्हती. गुजरातच्या तंत्रज्ञान विद्यापीठावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती असे पटेल यांनी सांगितले.