अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज संसदेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला शेवटचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विविध घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून केल्या जात आहेत. अशात सत्ताधारी विरूद्ध विरोधक असा सामना संसदेत पाहण्यास मिळाला. काही लोकप्रिय घोषणा केली की सत्ताधारी बाकं वाजवून मोदी-मोदीच्या घोषणा करत होते. या घोषणांना विरोधकांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच काय झालं?

अमृत काळातला हा अर्थसंकल्प मी सादर करते आहे असं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. त्यानंतर काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या तेव्हा मोदी मोदीच्या घोषणा सत्ताधाऱ्यांनी दिल्या. त्यावेळी विरोधकांनी भारत जोडो, भारत जोडो या घोषणा दिल्या. अर्थसंकल्पाच्या सुरूवातीलाच या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर प्रत्येकवेळी जेव्हा सत्ताधाऱ्यांनी मोदी मोदी घोषणा दिल्या की त्यांना विरोधक भारत जोडो भारत जोडो या घोषणांनी उत्तर देत आहेत हे पाहण्यास मिळालं.

आणखी वाचा – निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये सांगितलेलं ‘श्रीअन्न’ काय आहे? Millets मुळे शरीराला होणारे फायदे जाणून घ्या

भारत जोडो यात्रेचा समोरप दोन दिवसांपूर्वीच

भारत जोडो यात्रेचा समारोप ३० जानेवारीला म्हणजेच महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी राहुल गांधी यांनी केला. भारत जोडो यात्रेने देशाला प्रेमाचा आणि आपुलकीचा मार्ग दाखवला आहे आणि काँग्रेसला तिरस्कार संपवून देशात आपुलकी आणि प्रेम परत आणायचं आहे. लोकांलोकांमध्ये वाढलेली दुही संपवायची आहे. मोहब्बत की दुकान खोलने आया हूँ असं राहुल गांधी यांनी सांगितलं. १२ राज्यांमधून ही यात्रा गेली. ७ सप्टेंबर २०२२ ला सुरू झालेली ही यात्रा ३० जानेवारी २०२३ ला संपली. या यात्रेचा प्रभाव देशभरात पडला आहे असं राहुल गांधी यांनी सांगितलं. तसंच आम्ही ही यात्रा काँग्रेस पक्षासाठी नाही तर देशासाठी काढली होती असंही त्यांनी सांगितलं. याच भारत जोडो यात्रेचा उल्लेख घोषणा म्हणून संसदेत करण्यात आला.

आणखी वाचा – ‘आदर्श अर्थसंकल्प’ काय असतो? ChatGPT ने दिलेलं ‘हे’ उत्तर वाचून युजर्स म्हणाले, “आता अर्थमंत्र्यांची काय गरज?”

संसदेत सलग पाचव्यांदा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करत आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. त्यामुळे हे अमृत काळातलं बजेट आहे असं निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. अशात त्यांनी अर्थसंकल्पातल्या तरतुदी सांगितल्यानंतर मोदी मोदी घोषणा केल्यानंतर त्या घोषणांना भारत जोडो, भारत जोडो घोषणांनी उत्तर दिल्याचं पाहण्यास मिळालं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While nirmala sitharaman was presenting the budget the opposition responded with this slogans to the ruling party modi modi slogans scj