अटलांटामधील वादविवादाच्या मंचावरील निराशाजनक कामगिरीनंतर अध्यक्षपदाच्या स्पर्धेत येण्याबाबत गांभीर्याने विचार करीत असल्याचे संकेत बायडेन यांनी दिल्याचे निकटवर्तींयांनी सांगितले. परंतु हा दावा खोटा असल्याचे स्पष्टीकरण ‘व्हाईट हाऊस’ने बुधवारी दिले आहे.

बायडेन यांच्या अन्य सहयोगींनी जोर दिला की ते अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आगामी सुट्टीच्या दिवशी शनिवार व रविवारी त्यांच्या वादविवाद स्पर्धा अधिक चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहेत. विशेषत: शुक्रवारी ‘एबीसी न्यूज’च्या जॉर्ज स्टेफॅनोपौलो यांच्याबरोबर होणारी मुलाखत आणि पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिनमधील प्रचारावर त्यांनी जोर देणे गरजेचे असल्याचे सहयोगी पक्षांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>>काँग्रेस दलित, आदिवासी ओबीसीविरोधी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेत टीका, संविधानाला हरताळ फासल्याचा आरोप

बायडेन यांनी सहयोगींना सांगितले की, गेल्या आठवड्यातील वादविवाद स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर येत्या काही दिवसांत ते आपली उमेदवारी वाचवू शकणार नाहीत, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे निवडणूक रिंगणातून बाहेर पडण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. बायडेन यांची शुक्रवारी मुलाखत आणि प्रचार कार्यक्रम आहेत. या दोन्ही कार्यक्रमांप्रमाणे येत्या आठवड्याच्या अखेरीस अन्य दोन कार्यक्रम झाल्यास त्यांची निवडणुकीतील स्थिती चांगली असेल, असे सहयोगींनी सांगितले.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अँर्ड्यू बेट्स म्हणाले, की बायडेन यांच्याबाबत केलेले दाव खोटे आहेत. त्यांवर व्हाईट हाऊसला प्रतिसाद देण्यासाठी वेळ देण्यात आलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.