तालिबानने देश ताब्यात घेतल्याच्या एका आठवड्यानंतर अमेरिकन अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानमध्ये आयसिससारख्या (ISIS)अतिरेकी संघटानांकडून असलेल्या धोक्याबद्दल, देशाबाहेर पडण्याच्या प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर परिस्थितीमधून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी आणि लवकरात लवकर देशातून बाहेर पडण्यासाठी नागरिक काबूल विमानतळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीतीने झालेल्या गोंधळाच्या सात अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि लोकांचं स्थलांतर कोणतीही दुर्घटना न होता करण्यासाठी काबुलमधील अमेरिकन दूतावासाने हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणाला येता येईल?याबाबतचा तपशील जारी केला आहे. त्याचसोबत, विशेष सूचना मिळेतपर्यंत विमानतळावर न जाण्याचं आवाहन यावेळी अमेरिकन दूतावासाने केलं आहे. शनिवारी अमेरिकन दूतावासाने काबूल विमानतळाबाहेर ‘संभाव्य सुरक्षा धोक्यांचा’ इशारा पाठवला होता आणि अमेरिकन नागरिकांना सरकारी अधिकाऱ्याकडून वैयक्तिक सूचना मिळाल्याशिवाय विमानतळावर न येण्याचा सल्ला दिला होता.
सूचना मिळेपर्यंत विमानतळावर न जाण्याचं आवाहन
- जर तुम्ही अमेरिकन नागरिक असाल, अमेरिकन कायदेशीर कायमस्वरूपी रहिवासी, स्थलांतरित व्हिसा अर्जदार, किंवा अमेरिकन सरकारशी संलग्न असाल आणि तुम्हाला हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करण्यासाठी विशिष्ट सूचना मिळाल्या असतील तर तुम्हाला दिल्या गेलेल्या सूचनांचं पालन करा.
- जर तुम्ही SIV किंवा P1/P२ प्रक्रिया सुरू केली असेल, तर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी सूचना दिल्या जातील. या प्रक्रियेला जास्त कालावधी लागू शकतो.
- जर तुम्ही वरील गटांचा भाग नसाल. पण, अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर सूचना मिळेपर्यंत कृपया हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येऊ नका.
- तुमच्याकडे व्हेरीफाईड इन्व्हिटेशन नसल्यास, तुम्हाला विमानतळावर किंवा निर्वासितांच्या विमानामध्ये जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.
Who should come to the Hamid Karzai International Airport?https://t.co/KSCS8gLSI9 pic.twitter.com/lUQjRdNcEa
— U.S. Embassy Kabul (@USEmbassyKabul) August 23, 2021
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी १४ ऑगस्टपासून अमेरिका आणि सहयोगी सैन्याने अफगाणिस्तानातून सुमारे २८,००० लोकांना बाहेर काढलं असल्याचे म्हटलं आहे. “जुलैपासून आम्ही बाहेर काढलेल्या नागरिकांची एकूण संख्या अंदाजे ३३,००० पोहोचली आहे. तर, अमेरिकेच्या १४ सी-१७एस, ९ सी-१३० विमानांसह- २३ लष्करी विमानांनी रविवारी ३,९०० प्रवाशांना घेऊन काबूल सोडलं आहे. बायडेन पुढे म्हणाले कि, “याच कालावधी आमच्या लष्कराने आणखी ३५ चार्टर्ड फ्लाइट्सची सुविधा पोहोचली आहे. ज्याद्वारे अन्य देशांच्या अतिरिक्त ४,००० लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे.”