गंगेच्या स्वच्छतेसाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले असतानाच त्यांच्याच पक्षाच्या एका खासदाराने गुरुवारी लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासावेळी गंगा नदीसंदर्भात चमत्कारिक प्रश्न विचारून सर्वांनाच धक्का दिला.
भाजपचे खासदार प्रभातसिंह प्रतापसिंह चौहान यांनी गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासावेळी गंगा कोठून आली आणि गंगेमध्ये स्नान करण्याने काय परिणाम होतो, असे हटके प्रश्न विचारले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी वेगवेगळ्या विषयांवरील गंभीर प्रश्न सदस्यांकडून विचारले जातात. यामध्येच चौहान यांनी हसत हसत गंगा नदीविषयी असे प्रश्न विचारल्याने सत्ताधाऱयांसह विरोधकही आश्चर्यचकीत झाले. लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही हा काय प्रश्न आहे, असे चौहान यांना विचारले. त्यानंतर जलस्रोत खात्याचे राज्यमंत्री संवरलाल जाट यांनी भगिरथ राजाने गंगा आणल्याचे जुजबी उत्तर देऊन या संपूर्ण विषयावर पडदा टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा