करोनानंतर जगभरात सध्या मंकीपॉक्स आजाराने धुमाकूळ घातला आहे. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने पुरुषांना मंकीपॉक्सची लागण होण्याचा धोका जास्त असून, सेक्स पार्टनरची संख्या कमी ठेवण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटेनेचे प्रमुख टेड्रोस गेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी ही माहिती दिली आहे. नुकतंच जागतिक आरोग्य संघटनेने मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टेड्रोस गेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार “मे महिन्यात मंकीपॉक्सचा उद्रेक झाल्यापासून समोर आलेल्या प्रकरणांपैकी ९८ टक्के प्रकरणांमध्ये समलिंगी, उभयलिंगी आणि पुरुषांसोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषांचा समावेश आहे”.

विश्लेषण : मंकीपॉक्स गंभीर आजार आहे का?

टेड्रोस यांनी जोखीम असणाऱ्यांना आपली सुरक्षा करण्यासाठी योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. “याचा अर्थ आपल्यासाठी आणि इतरांसाठी योग्य निवड करा,” असं ते म्हणाले आहेत. ट्रेड्रोस यांनी सध्याच्या घडीला आपले सेक्स पार्टनर कमी करा असा सल्लाही यावेळी दिला.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी मंकीपॉक्सची लागण झालेल्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला असून गर्दीच्या ठिकाणी इतरांच्या संपर्कात न येण्याचं आवाहन केलं आहे.

Monkeypox Symptoms & Precautions : मंकीपॉक्सपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

महत्वाचं म्हणजे अमेरिकेतील रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रांनी पुरुषांसोबत शारिरीक संबंध ठेवणाऱ्या पुरुषांना आपले सेक्स पार्टनर कमी करण्याचा सल्ला दिलेला नाही. मात्र शरिरावर पुरळ असणाऱ्यांना मंकीपॉक्सची लागण झाल्याची शक्यता असल्याने त्यांच्या त्वचेशी संपर्क होऊ देऊ नका असा सल्ला दिला आहे.

पाहा व्हिडीओ –

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, रुग्ण तसंच त्यांच्या कपडे, बेडशीटच्या संपर्कात आलेल्या कोणालाही मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने मुलं, गर्भवती महिलांना जास्त धोका असल्याचा इशारा दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who chief tedros ghebreyesus advises to reduce sex partners as monkeypox cases surge sgy