पंचाहत्तर वर्षांपूर्वी स्वातंत्र्यांसाठी भारतातील युवकांमध्ये नवा जोश निर्माण करण्यासाठी ‘चले जाव’ (Quit India) ही घोषणा देण्यात आली होती. या घोषणेशी महात्मा गांधी यांचे नाव जोडण्यात आले आहे. परंतु, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, ‘चले जाव’ ही घोषणा गांधीजींनी दिली नव्हती. त्यांनी फक्त ही मोहीम पुढे नेण्यात महत्वाची भूमिका होती. प्रत्यक्षात ‘चले जाव’ या घोषणेचे निर्माता काँग्रेसचे नेते यूसुफ मेहराली होते. त्यांनीच सर्वप्रथम ही घोषणा ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानावर अखिल भारतीय काँग्रेस महासमितीसमोर सादर केली होती. नंतर सर्वसंमतीने ही घोषणा मंजूर करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण देशभरात ‘चले जाव’ आंदोलन सुरू झाले. दरम्यान, या घोषणेचे खरे मानकरी कोण आहेत, याबाबत अनेक इतिहासकारांमध्ये मतमतांतरे आहेत. परंतु, माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार चले जाव या घोषणेचे श्रेय यूसुफ मेहराली यांच्याकडे जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यूसुफ मेहराली हे गांधीजींचे अत्यंत निकटवर्तीय होते. त्यांनी ही चळवळ सुरू करण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधींबरोबर त्यांनी भेट घेऊन त्यांना या घोषणेची माहिती दिली होती. यूसुफ मेहराली हे त्यावेळी मुंबईचे महापौर होते. स्वातंत्र्यासाठी ते आठ वेळा तुरूंगात जाऊन आले आहेत. याबाबत गोपाल स्वामी यांनी आपले पुस्तक गांधी अँड बॉम्बेमध्ये लिहिले आहे की, चले जाव ही घोषणा यूसुफ मेहराली यांनी महात्मा गांधी यांच्यासमोर सादर केली होती. त्याचा त्यांनी स्वीकार केला. दुसरीकडे यूसुफ यांचे चरित्रकार मधु दंडवते म्हणतात, यूसुफ यांनी चले Quit India नावाने एक बुकलेट प्रकाशित केले होते. या बुकलेटमध्ये १९४२ च्या चळवळीचा उल्लेख होता.

मधु दंडवते यांनी आपल्या पुस्तकात लिहिले होते, ‘Shantikumar Morarji has recorded that Gandhi conferred with his colleagues in Bombay on the best slogan for independence– when this was is not stated. One of them suggested ‘Get out’. Gandhi rejected it as being impolite. Rajagopalachari mentioned ‘Retreat’ or ‘Withdraw’. That too did not find favour. Yusuf Meherali presented Gandhi with a bow bearing the inscription ‘Quit India’. Gandhi said in approval, ‘Amen’.”

दुसरकीडे यूसुफ मेहराली सेंटरच्या सहसंस्थापकांपैकी एक जी.जी. पारिख म्हणतात की, यूसुफने ७ ऑगस्टच्या (१९४२) आधीच चले जाव लिहिण्यात आलेल्या बॅजची छपाई करण्यात आली होती. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले हे आंदोलन विचारपूर्वक केलेल्या रणनितीचा हा भाग होता. विशेष म्हणजे या आंदोलनात संपूर्ण देश सहभागी झाला होता. या आंदोलनामुळे ब्रिटिश सरकारला हादरा बसला होता. तेव्हा गवालिया टँक मैदानावर गांधीजींनी भाषणही केले होते. याच गवालिया टँक मैदानाला नंतर ऑगस्ट क्रांती मैदान म्हणून ओळखले जाऊ लागले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who coined the iconic slogan quit india 75 years ago yusuf meherally mahatma gandhi