पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ साली सत्तेत आल्यापासून जगभरात त्यांच्याविषयी चर्चा होत असते. पहिल्यांदा शपथ घेतल्यापासून ते आजतागायत मोदींचे परदेश दौरे अनेकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. सतत परदेश वाऱ्यांमुळे विरोधक त्यांच्यावर टीका करत असतात. या परदेश दौऱ्यातून देशाच्या तिजोरीवर आर्थिक भार पडत असल्याचेही विरोधक सांगत असतात. भाजपा आणि स्वतः मोदींनी या आरोपांना फार महत्त्व दिले नाही. उलट मोदीजी दिवसांचे १८ तास काम करत असल्याचा प्रचार भाजपाकडून केला जातो. एवढे तास काम करुनही पंतप्रधान मोदी या वयात आजारी पडले तर त्यांचा उपचाराचा खर्च कोण करतं? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांना देखील हा प्रश्न पडला आणि त्यांनी सरळ पंतप्रधान कार्यालयात माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली.

हे वाचा >> अग्रलेख : नवा दहशतवाद!

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
Rs 700 crore was recovered from liquor sellers pm Narendra Modi alleged
“काँग्रेसच्या सत्तेतील राज्य शाही परिवाराचे ‘एटीएम’, मद्यविक्रेत्यांकडून ७०० कोटी रुपयांची वसुली,” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात
Narendra Modi  statement on Ratan Tata as a leader and personality who cares for the weak
दुर्बलांची काळजी घेणारे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व: रतन टाटा

देशाचे पंतप्रधान हे देशात आणि परदेशात दौऱ्यावर असताना त्यांच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च कुणाकडून केला जातो? असा प्रश्न आरटीआयद्वारे विचारला गेला. यावर उत्तर देत असताना पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केले की, २०१४ पासून आतापर्यंत मोदींच्या वैद्यकीय खर्चापोटी पंतप्रधान कार्यालयाने एकही रुपया खर्च केलेला नाही. खरंतर आपल्याकडे खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांना अनेक सोयी-सुविधा पुरविल्या जातात. पंतप्रधानांना देखील अनेक सुविधा योजलेल्या आहेत. तरिही मोदींनी आतापर्यंत स्वतःचा वैद्यकीय खर्च स्वतःच केला आहे. सरकारच्या तिजोरीतून आजवर एकही रुपया खर्च झालेला नाही.

पंतप्रधान कार्यालयातील सचिव विनोद बिहारी सिंह यांनी प्रफुल्ल सारडा यांच्या या आरटीआय अर्जाला उत्तर देताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वैद्यकीय उपचारासाठी सरकारने तरतूद केलेली असते. मात्र याचा विनियोग आजवर करण्याची वेळ आलेली नाही. “पंतप्रधान कार्यालयातील माहितीनुसार मोदींवर उपचारासाठी आजवर खर्च झालेला नाही.”, असेही त्यांनी कळविले.

हे देखील वाचा >> Brazil Riots: ‘हा तर लोकशाहीवर हल्ला’, ब्राझीलच्या आंदोलनावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली खंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया चळवळीतून देशभरातील नागरिकांना उत्तम आरोग्याचा मंत्र दिला होता. आता त्यांनी स्वतःच्या उपचाराचा खर्च स्वतःच करुन देशातील १३५ कोटी नागरिकांना एक नवी प्रेरणा दिली आहे, अशी प्रतिक्रिया आरटीआय कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी दिली. “लोकांच्या कष्टाचा पैसा कर रुपातून सरकारकडे जात असतो. अशावेळी पंतप्रधान याचा वापर वैयक्तिक कामांसाठी वापर करत नाहीत, हा विश्वास आता आणखी दृढ झाला आहे. इतर खासदार आणि आमदारांनी देखील मोदींचा हा मार्ग स्वीकारला पाहीजे आणि त्यांचे वैयक्तिक खर्च स्वतःच्या पैशांतून करायला हवेत”, असेही सारडा यांनी सांगितले.