Uttarkashi Tunnel Rescue Operation Update : उत्तरकाशीच्या सिल्कियारा बोगद्यात अडकलेल्या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी बाहेर काढण्यात यश आलं आहे. या अतिमहत्त्वाच्या आणि आव्हानात्मक ठरलेल्या ऑपरेशनसाठी देशातील विविध यंत्रणा कार्यरत होत्या. तसंच, अनेक आंतरराष्ट्रीय यंत्रणांनीही त्यांचे प्रयत्न पणाला लावले होते. यामध्ये आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नॉल्ड डिक्स यांचाही समावेश होता. ऑस्ट्रेलिअन असलेले डिक्स हे जिनिव्हा येथील इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशनचे प्रमुख आहेत. भूमिगत बांधकामाशी संबंधित कायदेशीर, पर्यावरणीय, राजकीय जोखीम ते स्वीकारतात.

अर्नॉल्ड डिक्स हे इंटरनॅशनल टनेलिंग अँड अंडरग्राउंड स्पेस असोसिएशन (जिनेव्हा) चे अध्यक्ष आहेत. तसंच त्यांच्याकडे भूगर्भशास्त्रज्ञ, अभियंता आणि वकील यासारख्या इतर पदव्याही आहेत. अर्नॉल्ड डिक्स यांनी मेलबर्न येथील मोनाश विद्यापीठातून विज्ञान आणि कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संकेतस्थळावरील माहितीवरून ते कुशल वकील असल्याचंही सांगितलं जातंय. या बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याच्या ऑपरेशनमध्ये अर्नॉल्ड डिक्स २० नोव्हेंबर रोजी दाखल झाले होते.

Cyber ​​thieves rob senior citizen who advertised for remarriage Pune news
Pune Cyber Crime: पुनर्विवाहासाठी जाहिरात देणाऱ्या ज्येष्ठाला सायबर चोरट्यांचा गंडा
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
drought-prone villages Pune, works in drought-prone villages pune, drought-prone villages fund,
पुणे : दरडप्रवण गावातील कामांना गती, २०० कोटींचा निधी मंजूर
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
mmrda fined metro 9 contractor of rs 40 lakh after transit mixer operator die at metro site
मेट्रो ९ च्या कंत्राटदाराला ४० लाखाचा दंड; चालकाच्या मृत्यूनंतर एमएमआरडीएची कारवाई
loksatta readers feedback
लोकमानस: …त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी!

हेही वाचा >> Uttarkashi Tunnel Rescue : हुश्श! १७ दिवसांची मेहनत फळाला, बोगद्यात अडकलेले ४१ कामगार सुखरुप बाहेर, ‘असा’ पार पडला अंतिम टप्पा

गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ अर्नॉल्ड डिक्स कार्यरत आहेत. या तीन दशकांत त्यांनी अनेक भूमिका बजावल्या आहेत. भूमिगत सुरक्षेबाबत त्यांचं कार्य मोलाचं ठरलं आहे. २०१६ ते २०१९ या काळात त्यांनी कतार रेड क्रिसेंट सोसायटी (QRCS) मध्ये स्वयंसेवकाचे कार्य देखील केले. २०२० मध्ये, अर्नॉल्ड डिक्स यांनी लॉर्ड रॉबर्ट मायर पीटर विकरी QC मध्ये सामील होऊन अंडरग्राउंड वर्क्स चेंबर्स तयार केले. ते भूगर्भातील जटिल आणि गंभीर आव्हानांसाठी तांत्रिक आणि नियामक पर्याय सुचवतात.

आज बचावकार्याला सुरुवात केल्यानंतर ते म्हणाले होते की, बचाव कार्य पूर्णत्वास येत असल्याने बरे वाटत आहे. रॅट होल मायनिंग तज्ज्ञांनी शेवटचे काही मीटर ढिगाऱ्यातून खणून काढले. तसंच, या पर्वताने आम्हाला नम्रपणा शिकवला असल्याचंही ते म्हणाले..

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू होते. तांत्रिक पद्धतीने त्यांना बाहेर काढण्याचं काम चालू असताना अनेकांनी देवाकडेही प्रार्थना सुरू ठेवली होती. त्याचप्रमाणे अर्नॉल्ड डिक्स यांनीही त्याच्या पद्धतीनुसार, देवाकडे प्रार्थना केली होती. ख्रिसमसपर्यंत अडकलेल्या ४१ कामगारांना घरी पोहोचवण्याचं त्यांचं उद्दीष्ट्य होतं. परंतु, त्यांचं हे उद्दीष्ट्य त्याआधीच पूर्ण झालं. तसंच, दरम्यान, डिक्स यांनी बचाव कार्यातील प्रगतीला विलक्षण म्हटले होते.

Story img Loader