भारताच्या आयकर विभागात सहआयुक्त पदावर कार्यरत असलेल्या केजरीवाल यांनी नोकरीचा राजीनामा देत सक्रीय समाजकारणात उडी घेतली होती.  ‘रेमन मॅगसेसे’ पुरस्कार विजेत्या केजरीवाल यांना पक्षस्थापनेनंतर पक्षनिधीसह अनेक वादांमध्ये ओढले गेले, मात्र या सर्वाना ते चांगलेच पुरून उरले. भ्रष्टाचार विरोध आणि शासकीय कारभारातील पारदर्शकता या प्रमुख मुद्यांभोवती केजरीवाल यांनी आपले सारे लक्ष केंद्रीय केले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आप’च्या जाहीरनाम्याचे वैशिष्टय़
दिल्लीतील सर्वच्या सर्व म्हणजे ७० मतदारसंघातील समस्या लक्षात घेत प्रत्येक मतदारासंघासाठी उपयुक्त अशा एका मुद्याचा समावेश आम आदमी पक्षाच्या ७० कलमी जाहीरनाम्यात करण्यात आला होता.

जायंट कीलर
सलग १५ वर्षे मुख्यमंत्री राहणाऱ्या शीला दीक्षित यांचा पराभव करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांनी आपल्या विजयासह १९६७ मधील स.का.पाटील यांच्या पराभवाच्या स्मृतींना उजाळा दिला. काँग्रेस पक्षाच्या मुंबई या तत्कालीन बालेकिल्यात स.का.पाटील यांना कामगार चळवळीतील ज्येष्ठ नेते जॉर्ज फर्नाडिस यांनी धूळ चारत एकच खळबळ उडवून दिली होती. विशेष म्हणजे स.का.पाटील यांना त्यावेळी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखले जात होते.‘पाटीलमधील पी म्हणजे प्रोग्रेस (प्रगती), प्रॉस्परीटी (भरभराट) आणि परफॉर्मन्स (कामगिरी)’ अशी घोषणा स.का.पाटलांनी तयार केली होती. पण त्याला तितकेच दमदार उत्तर देत फर्नाडिस यांनी ‘पाटीलमधील पी म्हणजे पाटील पडलेच पाहिजेत’असा नारा दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is arvind kejriwal