Imran Masood : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरुन लोकसभेत चर्चा सुरु आहे. या विधेयकाला काँग्रेस, सपा, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), एआयएमआयएम या सगळ्याच पक्षांनी विरोध दर्शवला आहे. हे विधेयक संविधान विरोधी आहे अशी भूमिका विरोधकांनी घेतली आहे. तसंच सरकारचा वक्फच्या जमिनींवर डोळा आहे म्हणूनच हे विधेयक आणलं जातं आहे असाही आरोप केला आहे. दरम्यान लोकसभेतल्या चर्चेत इमरान मसूद यांनी मी रामाचा वंशज आहे मला मंदिर विश्वस्त समितीत घ्या अशी मागणी केली आहे. कोण आहेत हे इमरान मसूद जाणून घेऊ.

इमरान मसूद यांनी काय मागणी केली आहे?

इमरान मसूद म्हणाले ” विधेयकाप्रमाणे वक्फ बोर्डातील २२ सदस्यांपैकी १२ बिगर मुस्लिम असतील. त्यांना वक्फबाबत काय माहिती असेल? जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या अंतिम क्षणी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत त्याची जमीन वक्फला दिली असेल तर तिला वक्फची जमीन म्हणून मंजुरी मिळणार नाही. कारण सरकार या विधेयकाद्वारे फक्त लिखित वक्फला मान्यता देतं आहे. १२ जण बिगर मुस्लिम असतील तर माझीही ही मागणी आहे की मी प्रभू रामचंद्रांचा वंशज आहे मला मंदिराच्या विश्वस्त मंडळात सहभागी करुन घ्या. जर कुणाला वाटत असेल की मी रामाचा वंशज नाही तर मी ही बाब सिद्ध करायलाही तयार आहे.” इमरान मसूद यांनी ही मागणी केल्यानंतर कोण आहेत इमरान मसूद हे देखील अनेकजण शोधत आहेत. जाणून घ्या कोण आहेत इमरान मसूद?

कोण आहेत इमरान मसूद?

इमरान मसूद यांचा जन्म एप्रिल १९७० मध्ये सहारनपूरच्या गंगोह भागात झाला आहे. त्यांच्या कुटुंबाची गणना प्रभावशाली कुटुंबांमध्ये होते. २००६ मध्ये इमरान मसूद हे सहारनपूर नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. २००७ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाकडे विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट मागितलं. मात्र समाजवादी पार्टीने त्यांना तिकिट दिलं नाही. ज्यानंतर मुजफ्फराबाद विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष लढले आणि ही निवडणूक जिंकले. २०१२ पर्यंत ते अपक्ष आमदार होते.

२०१४ मध्ये समाजवादी पक्षात प्रवेश

२०१२ मध्ये इमरान मसूद यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना नकुड या विधानसभा मतदारसंघातून तिकिट दिलं. मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये मग त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यावेळी सपाने त्यांना सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून तिकिट दिलं. मात्र २०१४ ची लोकसभा निवडणूकही इमरान मसूद हरले. २०१७ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पण पाच वर्षे काँग्रेस पक्षात झाल्यानंतर म्हणजेच २०२२ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा समाजवादी पक्षात प्रवेश केला.

२०२३ मध्ये काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी मसूद पुन्हा काँग्रेस पक्षात गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सहारनपूर या मतदारसंघातून त्यांना काँग्रेसने तिकिट दिलं आणि त्यांनी भाजपाच्या राघव लखनपाल यांचा पराभव केला आणि खासदारकीची निवडणूक जिंकली.

इमरान मसूद यांनी कोणती पदं भुषवली आहेत?

नगराध्यक्ष सहारनपूर नगरपालिका

उत्तर प्रदेश विधानसभेचे आमदार

उत्तर प्रदेश विधानसभेच्या विशेषाधिकार समितीची सदस्य

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे उपाध्यक्ष

उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सल्लागार परिषदेचे सदस्य

अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय सचिव आणि दिल्लीचे सचिव

२०२४ पासून सहारनपूरचे खासदार आहेत. लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा सुरु असताना मी प्रभू रामचंद्रांचा वंशज आहे असा दावा त्यांनी केला असून आपल्याला राम मंदिराच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून घेण्यात यावं अशी मागणी केली आहे. दरम्यान