मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. ही घटना मे महिन्यात घडली. मात्र या घटनेचा व्हिडीओ बुधवारी व्हायरल झाला. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणाचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. या सगळ्या घडामोडी घडत असताना सिने संवाद लेखक, कवी जावेद अख्तर यांनी या घटनेविषयी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चार जणांना अटक केली आहे. त्याविषयीच जावेद अख्तर यांनी संताप व्यक्त केला आहे.

काय म्हटलं आहे जावेद अख्तर यांनी?

मणिपूरची घटना ४ मे रोजी घडली आहे. दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. याकडे पोलीस प्रशासनाने सपशेल डोळेझाक केली. १९ जुलैला व्हिडीओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा चार संशयितांना २० जुलै रोजी अटक करण्यात आली. तुम्ही कुणाला मूर्ख बनवत आहात?” असा प्रश्न विचारत जावेद अख्तर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. जावेद अख्तर हे अनेकदा सामाजिक विषयांवर ट्विट करुन व्यक्त होत असतात. त्याच प्रमाणे मणिपूरच्या प्रकरणावरही त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. हे ट्वीट चांगलंच व्हायरलही होतं आहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
Attack on police officer on patrol
मुंबई : गस्तीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Bangladesh citizens Ratnagiri, Anti-Terrorism Squad,
रत्नागिरीत तेरा बांगलादेशी घुसखोरांना पकडले, दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई
Rupali Ganguly
Video: “खोटं बोलून करिअर…”, ‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुलीवर सावत्र मुलीचे आरोप; ईशा वर्माचा वडिलांवरही संताप

हे पण वाचा- महिलांना विवस्त्र केल्याप्रकरणी सरन्यायाधीशांच्या भूमिकेवर भाजपा नेत्याची टीका, म्हणाले, “…तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा”

काय आहे मणिपूरचं व्हायरल व्हिडीओ प्रकरण?

बुधवारी रात्री (१९ जुलै) सोशल मीडियावर मणिपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला; ज्यामध्ये पुरुषांचा एक मोठा गट दोन महिलांची रस्त्यावरून निर्वस्त्र धिंड काढत असल्याचे दिसत होते. त्यानंतर या महिलांना एका शेताच्या दिशेने घेऊन जाताना व्हिडीओत दिसत आहे. त्या ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप आदिवासी संघटनांनी केला आहे. ही घटना ४ मे रोजी थौबल जिल्ह्यात घडली असून, पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. १८ मे रोजी खांगपोकी जिल्ह्यात पोलिसांनी शून्य एफआयआर (शून्य एफआयआर म्हणजे ज्या ठिकाणी घटना घडली, ते सोडून दुसरीकडे एफआयआर दाखल करणे) दाखल केला. पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार व हत्येचा गुन्हा दाखल केला.

हे पण वाचा- “मणिपूर घटनेप्रकरणी भाजपाच्या मनात गुन्हेगारी भावना, म्हणूनच त्यांनी…”, बाळासाहेब थोरातांचा टोला

ज्या दोन महिलांवर अत्याचार करून, त्यांचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला, त्या महिला कुकी-झोमी समुदायाच्या असल्याचे सांगण्यात येते. खांगपोकी या डोंगराळ जिल्ह्यात या समुदायाचे प्राबल्य आहे. दोन महिलांपैकी एकीचे वय २०; तर दुसरीचे वय ४० असल्याचे कळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ अत्यंत विदारक परिस्थिती विशद करणारा असून, या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त होत आहे. पुरुषांचा जमाव या महिलांना बळजबरीने शेतात नेत असताना त्यांच्या शरीराची विटंबना करताना दिसत आहे.